ETV Bharat / sitara

लग्नानंतरची पहिली होळी साजरी करताना मौनी रॉय आणि सूरज नांबियार - मौनी रॉयची पहिली होळी

मौनी रॉयने लग्नानंतरच्या पहिल्या होळीची तयारी केली असून चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मौनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर पती सूरजला होळीच्या शुभेच्छा देत सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार
मौनी रॉय आणि सूरज नांबियार
author img

By

Published : Mar 18, 2022, 2:43 PM IST

मुंबई - लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय पती सूरज नांबियारसोबत यावर्षीच्या पहिल्या होळीचा आनंद साजरा करीत आहे. या खास प्रसंगी मौनीने चाहत्यांचे मन जिंकणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या यामधील एक फोटो तिच्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. मौनी आणि सूरज या वर्षी २७ जानेवारीला मल्याळी आणि बंगाली रितीरिवाजानुसार विवाहबद्ध झाले. आता हे जोडपे लग्नानंतरची पहिली होळी एन्जॉय करत आहेत.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार
मौनी रॉय आणि सूरज नांबियार

मौनी रॉयने लग्नानंतरच्या पहिल्या होळीची तयारी केली असून चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मौनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर पती सूरजला होळीच्या शुभेच्छा देत सुंदर फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत मौनीने भारतीय संस्कृती आणि परंपरेचे उत्तम उदाहरण दिले आहे.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार
मौनी रॉय आणि सूरज नांबियार

या जबरदस्त फोटोमध्ये मौनी रॉय पती सूरजच्या पायावर रंग लावून होळीच्या शुभेच्छा देत आहे. मौनीच्या या फोटोने तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत आणि ते पाहून फॉलोअर्स लाईक बटण दाबत आहेत.

मौनी रॉय आणि सूरज नांबियार
मौनी रॉय आणि सूरज नांबियार

बाकीच्या फोटोंमध्ये होळीच्या दिवशी मौनी-सूरजचं प्रेम पाहायला मिळतंय. या जोडप्याने होळीसाठी खास पांढरा पोशाख निवडला आहे. मौनी-रॉयने जवळपास तीन वर्षे सूरजला डेट केले आणि चाहत्यांना जास्त काळ ताटकळत न ठेवता 27 जानेवारी 2022 रोजी लग्न केले.

लग्नानंतर मौनी रॉयने हनिमून एन्जॉय केला आणि त्यानंतर ती तिच्या सासरच्या घरी गेली होती. तिथे अभिनेत्रीचे पूर्ण रितीरिवाजांनी गृहप्रवेश केला आहे. मौनीने हनिमूनचेही सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना भरभरून प्रेम दिले होते.

हेही वाचा - संजय दत्त आणि पाकिस्तानचे पूर्वाध्यक्ष परवेझ मुशर्रफ एकाच फोटोत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.