वरील फोटो मध्ये जे लोक दिसत आहे ते पॅसेंजर ट्रेन मधील जनरल बोगीत बसलेले नाहीत .. तर हे आहे आहे अफगाण नागरिकांनी भरलेले अमेरिकन विमान ..! तेथील लोक तालिबानच्या आगमनाने भयभीत झाले आहेत आणि देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरही ते माघार घेताना दिसत नाहीत. काबूल विमानतळावरून उड्डण करण्यासाठी सज्ज असलेले हे अमेरिकन विमानात दिसणारे हे दृश्य, अफगाण नागरिकांची दुर्दशा दर्शवते. विमानात एकूण 640 लोक बसले होते.
तालिबानच्या अराजक राजवटीने काळे दिवस पुन्हा येण्याची भीती बाळगून देश सोडून जाण्यासाठी हजारो अफगाणांनी सोमवारी काबूल विमानतळावर गर्दी केली. रहदारी वाढल्यामुळे विमानतळाचे दरवाजे बंद झाले, तेव्हा भयभीत नागरिकांनी भितीवरून उड्या मारल्या, लोखंडी कुंपणे ओलांडली आणि आत शिरले. विमानाच्या धावपट्टीवरही लोकांनी तोबा गर्दी केली होती.
अमेरिकन विमान दिसताच लोकांनी आत शिरण्यास सुरुवात केली. एकमेकांना अक्षरशः लटकत ते विमानात घुसले. सुमारे 640 अफगाण अमेरिकन विमानात चढले आणि खाली बसले. सोबत कोणतेही सामान न घेताच हे नागरिक मरणाच्या भीतीने हे सहन करीत होते. तालिबानपासून बचाव करण्यासाठी, देश सोडून जाण्याशिवाय दुसरा मार्ग त्यांना दिसत नव्हता.
लोक विमानात गेल्यानंतरचे चित्र एखाद्या रेल्वेच्या जनरल बोगीपेक्षाही भीषण होते. या विमानाचे फोटो अधिकृत अमेरिकन मीडिया कंपनी डिफेन्स वनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. इतर अमेरिकन विमानांमध्येही अशीच परिस्थिती दिसून आली.
विमान धावपट्टीवरुन धावत असताना चालत्या विमानाला काहीजण लटकल्याचे दृष्ये काल पाहायला मिळाले होते. विमानाचे पंख आणि टायरवर लोक बसल्याचेही चित्र होते. वर उडालेल्या विमातून तिघे जण हवेतून भिरकवल्याचे व जमिनीवर पडल्याचेही भयावर दृष्य काल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा - अफगाणिस्तानातील परिस्थितीला स्थानिक नेतेच जबाबदार - अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन