ETV Bharat / sitara

मोनालिसा बागल ‘नुसती ‘Shining' सह जपते सामाजिक बांधिलकी

अभिनेत्री मोनालिसा बागलला सुद्धा लसीचा पहिला डोस घेण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. त्याबद्दल तिची तक्रार अजिबात नाहीये आणि तिने आपल्या फॅन्सना सल्ला देखील दिलाय की लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरा. तिने सोशल मीडियावर लसीकरणाच्या दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.

मोनालिसा बागल
मोनालिसा बागल
author img

By

Published : Aug 11, 2021, 5:31 PM IST

मोनालिसा बागल सोशल मीडियावर खूप व्यस्त असते आणि ही सुंदर अभिनेत्री आपले छान छान फोटो टाकत असतानाच सामाजिक संदेश पोहोचविण्याचे कामही करत असते. गेली दीडेक वर्षे थैमान घातलेल्या कोरोना महामारीवर प्रतिबंधक लस जरी निघाली असली तरी ती सर्वांना लीलया मिळत नाहीये. अभिनेत्री मोनालिसा बागलला सुद्धा लसीचा पहिला डोस घेण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. त्याबद्दल तिची तक्रार अजिबात नाहीये आणि तिने आपल्या फॅन्सना सल्ला देखील दिलाय की लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क वापरा. तिने सोशल मीडियावर लसीकरणाच्या दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे.

त्याबद्दल बोलताना मोनालिसा म्हणाली, “'व्हॅक्सिनेशन' ही आधुनिक काळातील गरज आहे, भविष्याची गरज तर आहेच आहे असं म्हटलं तरी ते योग्य ठरणार आहे. कोरोनासारख्या महामारीतून आपल्या सर्वांची सुटका करून घेण्यासाठी आणि स्वतःला आणि इतरांना देखील सुरक्षित ठेवण्यासाठी 'लसीकरण' हा एकमेव उपाय आहे. 'लस घेऊन आपण सुरक्षित झालो आहोत, आता कशाला मास्क हवा', असा विचार करणारी लोकं आपल्या आजूबाजूला आहेत. परंतु माझा त्या सर्वांना सल्ला आहे की कोरोनासमोर कोणाचेही शहाणपण चालत नाही. कोरोना होऊ देण्यापेक्षा त्यापासून बचाव करणे जास्त सोप्प आहे. त्यामुळेच कोरोना रोखण्यासाठीच्या त्रिसूत्रीचा अवलंब करा. मुखपट्टी वापरा, सतत हात धुवा आणि सोशल डिस्टंसिंग पाळा.”

तिने नुकताच दुसरा फोटो शेयर केला “नुसती Shining” असं मजेशीर कॅप्शन टाकत. त्याचबरोबर मोनालिसाने सामाजिक आणि महत्त्वाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. ती पुढे म्हणाली की, “मी लस घेतली आहे. #GotVaccinated! तुम्ही अजून घेतली नसेल तर घ्या आणि सुरक्षित व्हा. जमेल तसं, लवकरात लवकर लस घ्या आणि लस घेतली असली तरी पण मास्कचा आवर्जून वापर करा."

हेही वाचा - टायगर श्रॉफचे पहिले हिंदी गाणे ‘वंदे मातरम’ जॅकी भगनानीने केले प्रदर्शित!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.