नवी दिल्ली - मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधू मिस यूएसए 2019 चेस्ली क्रिस्टच्या आकस्मिक निधनाबद्दलची बातमी ऐकून दु:खी झाली आहे. ३० वर्षीय ब्युटी क्वीन, वकील, फॅशन ब्लॉगर आणि एक्स्ट्रा टीव्ही वार्ताहर असलेली चेस्ली क्रिस्ट रविवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता न्यूयॉर्क शहरातील ६० मजली कॉन्डोमिनियमच्या उंच इमारतीवरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे एनवायपीडीच्या प्रवक्त्याने सांगितले.
सोमवारी हरनाझने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती इस्रायलच्या इलात येथे झालेल्या 70 व्या मिस युनिव्हर्स 2021 मधील विजयानंतरचा क्षण चेस्लीसोबत हसत शेअर करताना दिसते. पुढे तिने लिहिलंय, "हे हृदयद्रावक आणि अविश्वसनीय आहे, तू नेहमीच अनेकांसाठी प्रेरणास्थान होतीस. रेस्ट इन पीस चेस्ली."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वृत्तानुसार, NYPD ने शेअर केले आहे की नवव्या मजल्यावर राहणाऱ्या क्रिस्टचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे दिसत आहे आणि वैद्यकीय परीक्षकांनी अद्याप अधिकृत कारण निश्चित केलेले नाही.
क्रिस्टचा जन्म जॅक्सन, मिशिगन येथे 1991 मध्ये झाला आणि ती दक्षिण कॅरोलिनामध्ये मोठी झाली. तिने दक्षिण कॅरोलिना विद्यापीठात शिक्षण घेतले आणि 2017 मध्ये वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून पदवी प्राप्त केली. तिने नॉर्थ कॅरोलिना फर्म Poyner Spruill LLP येथे दिवाणी वकील म्हणून काम केले. तिने व्हाईट कॉलर ग्लॅम या महिला व्यवसायिक पोशाख ब्लॉगची स्थापना केली.
2019 मध्ये तिने मिस नॉर्थ कॅरोलिना यूएसएचा खिताब जिंकला आणि मिस यूएसए 2019 चा मुकुट जिंकल्यानंतर तिने कामातून विश्रांती घेतली. 2020 मध्ये तिच्या फर्मने तिची पहिली विविधता सल्लागार म्हणून नियुक्ती केली. तसेच 2019 मध्ये क्रिस्टने न्यूयॉर्क वार्ताहर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.
हेही वाचा - सलमान खानला 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, जॉन ट्रॅव्होल्टासोबतचा व्हिडिओ व्हायरल