ETV Bharat / sitara

'मिर्झापूर 2' मध्ये अश्लीलता आणि हिंसा पुरेपूर भरलेली - राजू श्रीवास्तव

author img

By

Published : Oct 26, 2020, 8:16 PM IST

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी 'मिर्झापूर 2' या वेब सिरीजमधील अश्लीलता आणि हिंसाचाराबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी खासदार अनुप्रिया पटेल यांनीही या वेब सिरीजवर आक्षेप घेतला होता.

Raju Srivastava
राजू श्रीवास्तव

लखनौ - अपना दल पक्षाच्या खासदार अनुप्रिया पटेल यांच्यानंतर सुप्रसिद्ध कॉमेडियन आणि यूपी फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे चेअरमन राजू श्रीवास्तव यांनीही 'मिर्झापूर 2' या वेब सिरीजमधील अश्लीलता आणि हिंसाचाराबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रीवास्तव म्हणाले की, ''मिर्झापूर 2' वेब मालिका अश्लीलता आणि हिंसाचारांनी भरलेली आहे.

त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे व संबंधित अधिकाऱ्यांना सेन्सॉर बोर्डाने डिजिटल प्लॅटफॉर्मवरील आशय प्रदर्शित करण्यासाठी धोरण ठरवण्याचे आवाहन केले आहे.

यापूर्वी खासदार अनुपिया पटेल यांनीही मिर्झापूर 2 वर आक्षेप घेत म्हटले होते की, यामुळे मिर्झापूर या मतदारसंघाचे नाव कलंकित झाले आहे.

त्या म्हणाल्या होत्या की, वेब सीरिजने जिल्ह्याचे चुकीचे वर्णन केले असून जातीय हिंसाचाराला चालना दिली आहे.

गुरमीतसिंग आणि मेहिर देसाई दिग्दर्शित ही मालिका २३ ऑक्टोबरपासून अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.