ETV Bharat / sitara

'तू म्हणशील तसं'चा हैदराबादमध्ये प्रयोग, रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कॅप्टन लेलेंचे आवाहन

संकर्षण कऱ्हाडे लिखीत 'तू म्हणशील तसं' या नाटकाचा प्रयोग २ एप्रिल रोजी हैदराबादच्या रविंद्र भारतीमध्ये पार पडणार आहे. यात संकर्षण आणि भक्ती देसाई यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कोरोनाच्या प्रदीर्घ काळानंतर रंगभूमी पुन्हा सज्ज होत असून हैदराबादच्या नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने कॅप्शन स्वरुप लेले यांनी केले आहे.

Capt. Lele's appeal
कॅप्टन लेले यांचे आवाहन
author img

By

Published : Mar 27, 2021, 3:20 PM IST

Updated : Mar 29, 2021, 11:26 AM IST

हैदराबाद - कोरोना संसर्गामुळे गेली वर्षभर जागतिक रंगभूमी शांत आहे. गेली वर्षभर आभासी माध्यमातून काही नाट्य प्रयोग सादर झाले. परंतु प्रेक्षकांविना, थेट प्रतिसादाविना रंगभूमीवरील कलाकार खुलत नाही. मराठी नाटकांसाठी आता थिएटर्स काही अटींवर खुली झालेली असली तरी प्रेक्षक अजूनही नाटकाला जायला कचरताहेत. महाराष्ट्रात असी स्थिती असताना आज जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने हैदराबादकरांनी एक सुखद धक्का दिलाय. हेल्थ लिग या संस्थेच्या वतीने 'तू म्हणशील तसं' हा मराठी नाट्य प्रयोग २ एप्रिल रोजी हैदरबादच्या रविंद्र भारतीमध्ये आयोजित करण्यात आलाय आणि याला नाट्य रसिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिलाय.

कॅप्टन लेले यांचे आवाहन

'तू म्हणशील तसं' हे नाटक राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केले आहे. संकर्षण कऱ्हाडे याने याचे लेखन केले असून मुख्य भूमिकाही तो साकारत आहे. भक्ती देसाई यांनी त्याला चांगली साथ दिली आहे आणि दोघांची केमिस्ट्री अगदी करेक्ट जुळून आली आहे. महाराष्ट्रीय प्रेक्षक आणि समिक्षक यांनी कौतुक केलेल्या या नाटकाचे नुकतेच १०० प्रयोग पार पडले आहेत. हे नाटक हैदराबादमधील मराठी रसिकांना हवे होते. याची जोरदार मागणी सोशल मीडियावर होत होती. अखेर रसिकांचे हे स्वप्न हेल्थ लिगच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.

सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे तेलंगना सरकारने आखून दिलेल्या सर्व कोविड १९ नियमांचे पालन करुन हा प्रयोग आयोजित केला आहे. त्यामुळे हैदराबादच्या रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हेल्थ लिगचे कार्यवाह कॅप्टन स्वरुप लेले यांनी केले आहे. आज साजरा होत असलेल्या जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छाही कॅप्टन लेले यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ यांचा ‘प्रवास’ झाला पुरस्कृत!

Last Updated : Mar 29, 2021, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.