मुंबई - लॉकडाऊनमुळे बॉलिवूड सेलेब्रिटी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर आपल्या उपक्रमांचे फोटो व्हिडिओ ते शेअर करीत असतात. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने एक व्हिडिओ शेअर केलाय. यावर सगळ्यांच्या नजर खिळल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
माधुरीने आपल्या नृत्याची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओला तिचा मुलगा अरीन याने तबल्यावर साथ दिली आहे. थोड्या वेळानंतर माधुरी आपल्या मुलाला पदलालित्य शिकवतानाही दिसत आहे.
इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओत माधुरीने पायात घुंगरु बांधलेले दिसतात. तर तिचा मुलगा तबल्यावरती साथ देताना दिसत आहे. तिच्या घुंगराच्या तालाशी त्याच्या तबल्याच्या तालाचे उत्तम जमले आहे.
''वेगळे राहणे नेहमीच आपल्याला हव्या त्या गोष्टी करायला लावते. मला नियमित काय करायचे आहे हे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत पाहा,'' असे तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.