सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी जगप्रसिध्द पॉप सिंग मायली सायरस आणि लियाम हेम्सवर्थ यांचा संसार केवळ ८ महिन्यातच मोडकळीस आला आहे. दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतलाय. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दोघांनी लग्न केले होते. मायलीच्या जवळच्या व्यक्तीने या बातमीला दुजोरा दिलाय.
गेल्या वर्षी मायली सायरस आणि लियाम हेम्सवर्थ यांच्या रिलेशनची चर्चा होती. लग्नानंतरही हे जोडपे चर्चेत होते. परंतु आता हा संसार मोडण्यापर्यंत गेलाय. गेल्यावर्षी एकमेकांच्या सहवासासाठी सतत आतुर असलेल्या या जोडप्याला केवळ ८ महिन्यातच दोघांनाही एकमेकांचा कंटाळा आलाय.
मायलीच्या प्रवक्त्याने ही गोष्ट स्पष्ट केली आहे. दोघेही आपआपल्या करियरवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्याने म्हटलंय. दोघांच्याही खासगी आयुष्यात लोकांनी आणि मीडियाने लक्ष घालू नये, असे आवाहनही त्यांनी केलंय.