ETV Bharat / sitara

खळखळून हसवण्यासाठी झी टॉकीज घेऊन आलीय ‘लाफ्टर डे फिल्म फेस्टिवल’!

पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागत असलेला मराठी प्रेक्षक मनोरंजासाठी पुन्हा छोट्या पडद्याकडे वळलाय. येत्या २ मे ला सर्वत्र लाफ्टर डे साजरा करण्यात येईल आणि झी टॉकीज त्या अनुषंगाने आपल्या वाहिनीवर हास्यस्फोट घडवून आणणार आहे. झी टॉकीज २ मे रोजी प्रेक्षकांसाठी पूर्ण दिवस सुपरहिट कॉमेडी चित्रपटांची मेजवानी देणार आहेत. टेन्शन फ्री होऊन खळखळून हसवण्यासाठी आणि लाफ्टर डे साजरा करण्यासाठी झी टॉकीज वाहिनी विशेष फिल्म फेस्टिवल घेऊन आली आहे.

गाञवाच लग्न
गाञवाच लग्न
author img

By

Published : May 2, 2021, 9:21 AM IST

मुंबई - पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागत असलेला मराठी प्रेक्षक मनोरंजासाठी पुन्हा छोट्या पडद्याकडे वळलाय. येत्या २ मे ला सर्वत्र लाफ्टर डे साजरा करण्यात येईल आणि झी टॉकीज त्या अनुषंगाने आपल्या वाहिनीवर हास्यस्फोट घडवून आणणार आहे. झी टॉकीज २ मे रोजी प्रेक्षकांसाठी पूर्ण दिवस सुपरहिट कॉमेडी चित्रपटांची मेजवानी देणार आहेत. टेन्शन फ्री होऊन खळखळून हसवण्यासाठी आणि लाफ्टर डे साजरा करण्यासाठी झी टॉकीज वाहिनी विशेष फिल्म फेस्टिवल घेऊन आली आहे.

‘लाफ्टर डे फिल्म फेस्टिवल
‘लाफ्टर डे फिल्म फेस्टिवल
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसं त्यांच्या कामामध्ये प्रचंड गुरफटून गेली आहेत. त्यामुळे कुठे तरी त्यांचं हास्य हरवत चाललं आहे. त्यातच आता संपूर्ण जगात थैमान घातलेल्या ‘कोरोना’मुळे चिंतेत अधिक भर घातली आहे. या साऱ्याचा परिणाम शरीरावर आणि मनावरही होतो. हे सारं टाळायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्व समजून देण्यासाठी जगभरामध्ये हास्य दिन साजरा केला जातो. या हास्य दिना निमित्त झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही सुपरहिट विनोदी चित्रपट सादर करणार आहे. रविवार २ मे रोजी सकाळी ९ वाजल्या पासून झी टॉकीजवर विनोदी चित्रपटांची आतिषबाजी होणार आहे.
बनवाबनवी
बनवाबनवी
सकाळी ९ वाजता विनोदवीर मकरंद अनासपुरे चा ‘गाढवाचं लग्न’ तर दुपारी १२ वाजता ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. दुपारी ३ वाजता विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांचा ‘पहिली शेर, दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’ हा चित्रपट तर संध्याकाळी ६ वाजता विनोद या शब्दाला जगणारे अभिनेते दादा कोंडके यांचा सुपरहिट चित्रपट ‘पळवापळवी’ प्रसारित होईल. रात्री ९ वाजता ‘भाऊचा धक्का’ हा खास विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
पळवा पळवी
पळवा पळवी
सकाळी ९ वाजल्या पासून झी टॉकीज वर रंगणार आहे लाफ्टर डे फिल्म फेस्टिवल, येत्या २ मे रोजी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.