मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या तिच्या आगामी 'मीमी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका माझ्यासाठी आव्हान असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच, 'मीमी' चित्रपटातील अनुभव देखील तिने शेअर केला आहे.
'मीमी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप मजा आली. या चित्रपटाची कथा मला खूप आवडली होती. अतिशय सुंदर अशी या चित्रपटाची कथा आहे. 'सरोगसी' सारखा विषय या चित्रपटातून सुंदर पद्धतीने हाताळला आहे.
हेही वाचा -'तीच' आहे खरी बागी, 'त्या' वक्तव्यानंतर दिग्दर्शक अहमद खान यांनी केली कंगनाची प्रशंसा
लक्ष्मण उतेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, दिनेश विजन हे या चित्रपटाचे निर्माते आहे. हा चित्रपट 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा -अमिताभ बच्चनने शेअर केला फोटो, त्या 'कॅप्शन'ने जिंकली चाहत्यांची मने