मुंबई - बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' अशी प्रतिमा असलेला कार्तिक आर्यन आगामी चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करणार आहेत. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे. आता ते कार्तिकसोबत मिळून एका अॅक्शन चित्रपटाची तयारी करणार आहेत.
टी - सीरिझचे भूषण कुमार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. विदेशातील विविध ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येईल. भूषण कुमार यांनी यापूर्वी कार्तिक आर्यनच्या 'सोनु के टिटू की स्विटी', पती, 'पत्नी और वो' आणि आगामी 'भूल भुलैय्या २' यांसारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
IT'S OFFICIAL... #KartikAaryan to collaborate with #Tanhaji director Om Raut... An action film in 3D... Produced by Bhushan Kumar. pic.twitter.com/7yEMNrIUeL
— taran adarsh (@taran_adarsh) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... #KartikAaryan to collaborate with #Tanhaji director Om Raut... An action film in 3D... Produced by Bhushan Kumar. pic.twitter.com/7yEMNrIUeL
— taran adarsh (@taran_adarsh) February 9, 2020IT'S OFFICIAL... #KartikAaryan to collaborate with #Tanhaji director Om Raut... An action film in 3D... Produced by Bhushan Kumar. pic.twitter.com/7yEMNrIUeL
— taran adarsh (@taran_adarsh) February 9, 2020
हेही वाचा -'केजीएफ चॅप्टर २' मध्ये झळकणार ९० चं दशक गाजवणारी 'ही' अभिनेत्री
आपल्या पहिल्याच अॅक्शन चित्रपटाबद्दल कार्तिक आर्यनने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'बऱ्याच दिवसांपासून मला अॅक्शन चित्रपटात भूमिका साकारण्याची इच्छा होती. अलिकडेच मी 'तान्हाजी' चित्रपट पाहिला. या चित्रपटात साकारण्यात आलेल्या दृश्यांमुळे मी प्रभावित झालो आहे. ओम राऊत हे अॅक्शन चित्रपटाची स्टोरीलाईन अगदी योग्य पद्धतीने हाताळू शकतात. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे', असं तो म्हणाला.
हेही वाचा -'लव्ह आज कल': सारा - कार्तिकच्या 'ईटीव्ही भारत'शी दिलखुलास गप्पा
या चित्रपटाच्या कथेत कार्तिकची भूमिका अगदी तंतोतत बसते. त्यामुळे या चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे, असे दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले. कार्तिक शिवाय आणखी कोणते कलाकार यामध्ये भूमिका साकारणार आहेत, हे जाहीर करण्यात आले नाही. मात्र, कार्तिकला अॅक्शन अवतारात पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता वाढणार आहे.
हेही वाचा -Exclusive : कुटुंबासोबत पाहता येईल असा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' - गजराज राव