मुंबई - देशभरात होळीचा सण उत्साहात सुरू आहे. रंग आणि गुलालाच्या उधळण करीत उत्साही तरुणांच्या टोळ्या रस्त्यावरून फिरत आहेत. इथे बॉलिवूड सेलेब्सही आपापल्या स्टाइलमध्ये होळी साजरी करण्यात व्यस्त आहेत. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर इतर अनेकांनी ही प्रक्रिया सुरू ठेवली आहे. आता बॉलिवूडच्या दोन सुंदर महिला प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर खान यांनी चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका चोप्रा तिच्या नवजात बाळासोबत पहिली होळी साजरी करत आहे. तर करिना कपूर आपला दुसरा मुलगा जेहसोबत मस्ती करत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करीना कपूर खानने तिच्या मालदीवच्या होळीच्या सुट्टीतील फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत करीना लहान मुलगा जेहसोबत बीचवर वाळूचा ढिग बनवताना दिसत आहे. करीनाने मालदीवच्या सुट्टीतील दोन्ही मुले (तैमूर आणि जेह), मोठी बहीण करिश्मा कपूर आणि तिची सर्वात चांगली मैत्रीण नताशा पूनावाला यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
करीनाने मोठा मुलगा तैमूर अली खानचा जेट स्कीचा आनंद लुटतानाचा फोटो शेअर केला आहे. करिश्मा कपूरची दोन मुलं अदारा आणि कियानही इथे मस्ती करत आहेत.
इकडे प्रियंका चोप्रा तिच्या सासरी होळी साजरी करण्यासाठी रोमहून अमेरिकेत पोहोचली आहे आणि तिने फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. प्रियांकानेही इन्स्टाग्रामवर चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
#HappyHoli pic.twitter.com/Fc45iS6wog
— PRIYANKA (@priyankachopra) March 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#HappyHoli pic.twitter.com/Fc45iS6wog
— PRIYANKA (@priyankachopra) March 18, 2022#HappyHoli pic.twitter.com/Fc45iS6wog
— PRIYANKA (@priyankachopra) March 18, 2022
एका फोटोत तिने 'हाय होम' असे लिहिले आहे. प्रियांका आणि निक जोनास त्यांच्या नवजात बाळासोबत त्यांची पहिली होळी साजरी करत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास नुकतेच सरोगसीद्वारे पहिल्या मुलाचे पालक झाले आहेत.
हेही वाचा - Vivek Agnihotri Y Security : 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा