मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता राजकुमार राव यांचा 'मेंटल है क्या' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादविवादात अडकला आहे. अलिकडेच कंगनाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (CBFC) भेट दिली. या त्यांच्या मिटिंगमध्ये या चित्रपटाच्या नावामध्ये आणि काही सिनमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले आहेत. आता हा चित्रपट नव्या नावासह प्रदर्शित होणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत होत आहे. आता या चित्रपटाचे नाव 'जजमेंटल है क्या' असे करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या नावावरून इंडियन सायक्रॅटिक सोसायटी तर्फे प्रसून जोशी यांना याबाबत पत्र देखील पाठविण्यात आले होते. त्यात या शिर्षकावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे आता २६ जुलै रोजी हा चित्रपट नव्या नावासह प्रदर्शित केला जाणार आहे.