मुंबई - कंगना रनौत तिच्या 'मणिकर्णिका' चित्रपटानंतर 'मेंटल है क्या' या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या पोस्टरनंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरता होती.
'मेंटल है क्या' चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव आणि कंगना हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोघांचाही हटके लूक पाहायला मिळाला. या चित्रपटात दोघेही मनोरुग्ण दाखविण्यात येणार आहेत. कंगना खऱ्या आयुष्यातही मानसिक तनावाला सामोरी गेली असल्याने तिने या चित्रपटाची निवड केली असल्याचे तिने सांगितले होते.
आता या चित्रपटाचा ट्रेलर १९ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाच्या शिर्षकावरून काही वादही झाले होते. मात्र, आता हेच शिर्षक ठेवून चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.