मुंबई - सध्या कलाविश्वात सेलेब्रेटींच्या लग्नाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. बरेच कलाकार यावर्षी लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. छोट्या पडद्यावरील कलाकारही आपल्या भावी आयुष्याला सुरुवात करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीचा बॉयफ्रेंड शलभ डांगसोबत साखरपुडा झाला होता. त्यांचा विवाहसोहळा देखील थाटामाटात पार पडला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काम्या आणि शलभच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिने मेहंदी, हळदी या समारंभाचेही फोटो पोस्ट केले होते. आता त्यांच्या लग्नासोहळ्यातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. नव्या नवरीच्या रुपात काम्या सुंदर झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -सारा अली खानचा मिठाईवर ताव, व्हिडिओ व्हायरल
मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आज म्हणजे ११ फेब्रुवारीला ते भव्यदिव्य रिसेप्शनही देणार आहेत. त्यानंतर दिल्ली येथे आणखी एक रिसेप्शन दिले जाणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काम्या आणि शलभ मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शलभ हा दिल्ली येथील हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -शाहरुखच्या लाडक्या लेकीचा मिरर फोटो व्हायरल