मुंबई - 'काली खुही' हा चित्रपट भय, प्रेम, आशा आणि दृढता यांच्याबद्दलचा असल्याचे ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे. जेव्हा आपल्यावर एखादे संकट येते, तेव्हा अनपेक्षित ठिकाणावरुन कसे आपल्याला बळ मिळते हे यात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा करीत आहे.
'काली खुही' चा अर्थ आहे काळी विहीर. १० वर्षांची एक मुलगी आपल्या आजीच्या घरी जाते, याची कथा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. तिला हे माहिती नाही की, या घरावर प्रेतआत्म्यांची सावली आहे. ती तिथं पोहोचेपर्यंत अनेक अजब, अद्भूत, विचित्र घटना घडायला लागतात. 'काली खुही' हा हॉरर ड्रामा 30 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर सुरू होणार आहे.