मुंबई - 'प्रबोधन गोरेगाव' संस्थेतर्फे आयोजित 'प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते. ‘खिसा’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वेत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.
या फेस्टिवलची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण केली असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान’, ‘ओबरहौसेन’ (जर्मनी), कार्लोवी वेरी(झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण! - कलामहर्षी बाबूराव पेंटर
राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.