ETV Bharat / sitara

'कागर', 'सैराट'च्या टीमसोबत रंगणार 'एकदम कडक' एपिसोड

या भागामध्ये नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे आणि कागर चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत

'सैराट'ची टीम
author img

By

Published : Apr 21, 2019, 9:59 AM IST

मुंबई - कलर्स मराठीवरील 'एकदम कडक' या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील भाग विशेष असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने तसेच संपूर्ण महाराष्ट्राची मने ज्या दोन कलाकरांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात जिंकली, असे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे 'एकदम कडक'च्या मंचावर येणार आहेत.

रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे यांचा “कागर” हा सिनेमा येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम आणि चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते, विकास हांडे, शशांक शेंडे हेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. एकदम कडक या कार्यक्रमाच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी करत आहे. या भागामध्ये नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे आणि कागर चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

या कार्यक्रमामध्ये रिंकू आणि शुभंकर यांनी कागर या चित्रपटातील लागलीया गोडी तुझी या गाण्यावर सुंदर डान्स सादर करताना दिसणार आहेत. यासोबतच 'कागर'च्या संपूर्ण टीमने त्यांचा चित्रिकरणादरम्यानचा अनुभव, किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. 'कागर' चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी चित्रपटाच्या कथेबद्दल त्यांचं मत गप्पांमधून सांगितलं आहे.

Intro:कलर्स मराठीवरील 'एकदम कडक' या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील भाग विशेष असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने तसेच संपूर्ण महाराष्ट्राची मने ज्या दोन कलाकरांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटामध्ये जिंकली असे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे 'एकदम कडक'च्या मंचावर येणार आहेत. रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे यांचा “कागर” हा नवा सिनेमा येत्या २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यानिमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम देखील म्हणजेच चित्रपटाचे निर्माते सुधीर कोलते, विकास हांडे, शशांक शेंडे, हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. या दरम्यान या सगळ्यांनीच बऱ्याच गंमतीजमती, किस्से, आठवणी प्रेक्षकांना सांगणार आहेत. कागर विशेष भागाचे सूत्रसंचालन आदर्श शिंदे यांनी केले आहे. तर एकदम कडक या कार्यक्रमाच्या विशेष भागाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी यांनी केले आहे. या भागामध्ये नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांनी बरीच धम्माल मस्ती केली आहे आणि कागर चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. “एकदम कडक” कार्यक्रमाचा हा विशेष भाग येत्या आठवड्यात सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवरन प्रसारीत केला जाईल.

एकदम कडक कार्यक्रमामध्ये रिंकू आणि शुभंकर यांनी कागर या चित्रपटातील लागलीया गोडी तुझी या गाण्यावर सुंदर डान्स सादर केला आहे. कागर या चित्रपटातील संपूर्ण टीमने त्यांचा चित्रिकरणा दरम्यानचा अनुभव, किस्से, त्यांच्या भुमिकेबद्दल आणि कथेबद्दल सांगितले. रिंकूने सांगितले कागर सारखा सिनेमा येण्याची मी वाट बघत होते कारण यातली माझी भूमिका वेगळी आहे आणि चित्रपटाचा विषय देखील वेगळा आहे. याच बरोबर कागर चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी कागर चित्रपटाच्या कथेबद्दल त्यांचं मत या गप्पांमधून सांगितलं आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.