ETV Bharat / sitara

"मला 'दुर्दैवी अभिनेता' म्हणून ओळखले जायचे" - जिशू सेनगुप्ता - बंगाली स्टार जिशु सेनगुप्ता

अभिनेता जिशु सेनगुप्ताने नुकतेच नेपोटिझ्म आणि उद्योगातील भेदभाव यावर आपले मत मांडले. मर्दानी चित्रपटातील या अभिनेत्याने असे उघडकीस आणले की जवळजवळ एक दशकासाठी त्याला एक 'दुर्दैवी अभिनेता' म्हणून ओळखले जात होते. परंतु चांगली कामगिरी करण्यापासून तो थांबला नाही. नेपोटिझ्म तिथे आहे आणि तो पुढेही राहील असे तो म्हणाला.

Jisshu Sengupta
जिशू सेनगुप्ता
author img

By

Published : Jul 31, 2020, 2:46 PM IST

मुंबई - बंगाली स्टार जिशु सेनगुप्ता याने नेपोटिझ्मवर बोलताना म्हटलंय की, तुम्ही स्टार किड असा किंवा नसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकणे हे तुमच्या प्रतिभा आणि नशिबावर अवलंबून असते.

शकुंतला देवी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपटात जिशूने विद्या बालनसोबत काम केले आहे. समकालीन बंगाली चित्रपटातून आलेल्या जिशूने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

"लोक खरोखर याबद्दल का बोलत आहेत हे मला खरोखर माहित नाही. तो (नेरोटिझ्म) नेहमीच होता, तिथेच असेल. माझ्या मुलीने आधीच एक चित्रपट केला आहे. ती खूप लहान आहे पण ती एक चांगली अभिनेत्री आहे. जर तिला सिनेमामध्ये करियर करायचे असेल आणि मी तिला मदत केली तर त्या गैर काय आहे ? मी तिच्यासाठी पैसे ठेवू शकतो आणि मी करेन. जर मी तिला पाठिंबा दिला आणि तिच्यासोबत सिनेमा बनवला तर मला वाटते की ती एके दिवशी मोठी होईल, यात चुकीचे काय आहे. यात मला कोणतीही अडचण वाटत नाही. हा नेपोटिझ्म असेल तर मला माहिती नाही पण मी माझ्या मुलीला मदत करणार. मात्र एकाच अटीवर तिच्यामध्ये प्रतिभा असली पाहिजे आणि तिने ती सिध्द केली पाहिजे." असे जिशू मम्हणाला.

तो पुढे म्हणाला, "जर काही चुकीचे घडत असेल तर आपण निषेध करावा परंतु आपण पुरावा नसताना इतरांचा न्याय करू नये. यावर माझा विश्वास आहे."

बांगला चित्रपटात ठसा उमटवण्याव्यतिरिक्त जिशुने बॉलिवूडमध्ये मर्दानी, बर्फी, पिकू आणि मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटांत काम केले आहे.

हेही वाचा - रियाच्या याचिकेनंतर सुशांतच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केले 'कॅव्हिएट'

त्याने कधी कोणत्याही प्रकारचा भेदभाव अनुभवला आहे? असे विचारले असता जिशू म्हणाला "बंगालमध्ये मला जवळजवळ दशकभरासाठी 'दुर्दैवी अभिनेता' म्हणून ओळखले जात होते परंतु चांगली कामगिरी करण्यापासून मी थांबला नाही. आत्ता मला वाटते की मी निर्मात्यांना पैसे परत देतो, "

शकुंतला देवी या चित्रपटात विद्या बालन, जिशू सेनगुप्तासह अमिता साध आणि सान्या मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत. ३१ जुलै रोजी याचा ओटीटीवर प्रीमियर होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.