मुंबई - देशभरातील लॉक डाऊनमुळे कला विश्वातील कलाकार देखील आपल्या घरी वेळ घालवत आहेत. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत आहेत. तसेच या काळामध्ये ते त्यांच्या वेळेचा कसा उपयोग करत आहेत हे देखील शेअर करत आहेत. मात्र, अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिची आई म्हणजेच श्रीदेवी यांच्या आठवणीत भावूक झाली आहे. आपल्या आईच्या आठवणीत व्याकुळ होऊन तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
जान्हवीने आपल्या पोस्ट मध्ये बऱ्याच गोष्टी लिहल्या आहेत. तिने लिहिले आहे, की 'सध्याच्या काळात चैनीचं आयुष्य जगण्यापेक्षा साधेपणाने आयुष्य कसं जगावं हे शिकायला मिळतं आहे. मी जेव्हा कामात व्यग्र असते तेव्हा माझे कुटुंबीय माझी कशी वाट बघतात, हे जाणवत आहे. या सर्वांमध्ये आईची फार आठवण येत आहे. तिच्या ड्रेसिंग रूम मध्ये अजूनही तिची जाणीव होते. ती सतत माझ्याजवळ आहे, असेच नेहमी वाटत राहते, असे तिने श्रीदेवी यांच्या आठवणीत लिहलं आहे.
पुढे तिने ती या काळात काय काय शिकली ते देखील सांगितले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जान्हवीच्या या पोस्ट वर बऱ्याच सेलिब्रिटींनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.