मुंबई - बॉलिवूड कलाकार आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरुक असतात. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी ते नियमित व्यायाम, योगासने करत असतात. मात्र, सध्या देशभरात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने जिम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. आता जिम काही दिवसांसाठी जरी बंद असले, तरीही आपल्या व्यायामात खंड पडू न देता अभिनेत्री जॅकलिन आणि कॅटरिना कैफ यांनी घरच्या घरीच योगासने करण्याचा पर्याय निवडला आहे.
जॅकलिनने तिच्या घरातच योगा करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला तिने ‘व्यायाम करताना चांगलं गाणं ऐकत श्वास घेत राहा. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल,’ असा सल्ला दिला आहे. जॅकलिनने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्सही दिल्या आहेत.
- View this post on Instagram
Stretch 💖 keep that spine healthy and happy! Yoga poses are my fav, anytime, anywhere!
">
हेही वाचा -परदेशातून परतताच अनुप जलोटा यांना आयसोलेशनसाठी हलवले
तर, कॅटरिना कैफनेही कोरोनापासून बचावाकरता फिट राहणे कसे गरजेचे आहे, हे सांगितले आहे. तसेच काही योगासनाचे प्रकारही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. त्यांचा हा पर्याय इतरांसाठीही नक्कीच उपयोगी पडू शकतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, जॅकलिनचा अलिकडेच बिग बॉस फेम असिम रियाज सोबत होळीवर आधारित गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला. या गाण्यात जॅकलिन आणि असिमचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळाला. तर, कॅटरिना कैफची 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या 'कुडी नु नचने दे' या गाण्यात क्यूट झलक पाहायला मिळाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण जोहर, एकता कपूरने थांबवले प्रोडक्शन