ETV Bharat / sitara

तब्बल ३५ तास शूट करीत चित्रित झाला मन उडु उडु झालं मालिकेतील नवरात्री प्रसंग! - Hruta Durgule

झी मराठीवरील मालिका 'मन उडु उडु झालं' या मध्ये सुद्धा नवरात्रीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. इंद्रा आणि दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय.

तब्बल ३५ तास शूट करीत चित्रित झाला मन उडु उडु झालं मालिकेतील नवरात्री प्रसंग!
It took 35 hours to shoot the Navratri events in the series Man Udu Udu Jhalaya
author img

By

Published : Oct 16, 2021, 7:00 AM IST

मुंबई - टेलिव्हिजन मालिकांमध्ये अनेक सणवार जोशात साजरे केले जातात. हीच परंपरा कायम ठेवत झी मराठीवर नुकतीच रुजू झालेली मालिका 'मन उडु उडु झालं' मध्ये सुद्धा नवरात्रीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 'मन उडु उडु झालं' ही मालिका प्रचंड गाजतेय आणि त्याचसोबत त्यातील इंद्रा आणि दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना आवडतेय. सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यामुळे ही मालिका कशी मागे राहील. या मालिकेत देखील प्रेक्षकांना नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की दिपू अनवाणी नवरात्री साजरी करतेय आणि त्याच सोबत ती उपवास देखील करतेय. पण गरबा आणि दांडिया शिवाय नवरात्री अपूर्ण आहे आणि आता या मालिकेत प्रेक्षकांना दिपू आणि इंद्राचा गरबा आणि दांडिया देखील पाहायला मिळणार आहे. हा नवरात्री सिक्वेन्स शूट करण्यासाठी संपूर्ण टीमला चक्क ३५ तास लागेल. या सिक्वेन्सच्या शूटिंगचे सगळे डिटेल्स एका बीहाईंड द सिन व्हिडिओमध्ये कैद करून ऋताने तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना ऋता म्हणाली, "३५ तासांच्या शूटिंगची मेहनत ही अशी दिसते. पण शेवटी जेव्हा संपूर्ण सिक्वेन्स व्यवस्थित आणि छान शूट होतो तेव्हा आपण सगळा थकवा विसरून जातो. या सगळ्यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. मला अभिमान आहे की मी मन उडु उडु झालं या कार्यक्रमाचा हिस्सा आहे. प्रेक्षकांनी अगदी कमी वेळात आम्हाला स्वीकारलं आणि आमच्यावर खूप प्रेम केलं आणि पुढेही करत राहतील. प्रेक्षक हा नवरात्री विशेष भाग नक्की एन्जॉय करतील याची मला खात्री आहे. हृताने संपूर्ण टीमचे आभार मनात कृतज्ञता देखील व्यक्त केली.

'मन उडु उडु झालं' मालिकेप्रमाणेच या व्हिडिओला देखील प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत. मालिकेच्या टीमची मेहनत प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे यशस्वी होतेय असं म्हंटल जातंय. 'मन उडु उडु झालं' ही मालिका प्रसारीत होते सोम-शनी संध्याकाळी ७.३० वा. झी मराठी वाहिनीवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.