ETV Bharat / sitara

कोरोना व्हायरसचे नकली औषध विकल्या प्रकरणी 'आयर्न मॅन'ला अटक - Kith Lorence Middlebrooke

'आयर्नमॅन २' फेम अभिनेता किथ लॉरेन्स मिडलब्रुकला कोरोना व्हायरसचे नकली औषध विकल्याच्या ओरोपाखाली अमेरिकेच्या एफबीआयने अटक केली आहे.

Kith
किथ लॉरेन्स मिडलब्रुक
author img

By

Published : Mar 28, 2020, 1:45 PM IST

लॉस एंजेलिस - हॉलिवूड चित्रपट 'आयर्न मॅन2' आणि हिट सिरीयल 'एनटूरेज'चा अभिनेता किथ लॉरेंस मिडलब्रूक याला कोरोना व्हायरसचे नकली औषध विकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अमेरिकन एजन्सी एफबीआय (फेडरल ब्यूरो ऑफ इंवेस्टिगेशन) ने त्याला रंगेहात पकडले.

हॉलिवूड मीडियाच्या रिपोर्टनुसार, मिडलब्रुक तथाकथित क्वॉन्टम प्रिवेंशन सीवी इंक नामक कंपनीच्या औषधामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत होता. कोव्हिड-१९ संक्रमण रोखण्यासाठी आणि व्हायरस मारण्यासाठी हे औषध उपयुक्त असल्याचा तो दावा करीत होता.

एफबीआयने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये २५ मार्चला किथ मिडलब्रुक लॉस एंजेलिसमध्ये जाळ्यात अडकला. या स्टिंगमध्ये तो एफबीआयच्या एका अंडरकव्हर एजंटला गोळ्यांचे पाकिट देताना आढळून आला.

प्रसिध्द बास्केटबॉल खेळाडू अर्विन 'मैजिक' जॉन्सन हा क्वॉन्टम प्रिवेंशन सीवी इंक नामक कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्ट असल्याचा खोटा दावा केला होता. मात्र जॉन्सने आपल्या प्रतिज्ञापत्रात मिडलब्रुक या कंपनीबाबत काहीच कल्पना नसल्याचे म्हटले आहे.

कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रीक्टसाठी अमेरिकन अॅटार्नी निक हॅना यांनी लोकांना कोरोना व्हायरसच्या या नकली औषधांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. हॉलिवूडमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. अनेक सेलेब्रिटी या व्हायरसमुळे त्रस्त झाले आहेत. यात 'ब्रॉडवे' स्टार आरोन ट्वीएट, अभिनेत्री डेबी मज़ार, स्पेनिश ओपेरा सिंगर प्लेसिडो, हार्वे वेंस्टीन, इदरिस एल्बा आणि त्याची पत्नी सबरीना, टीवी होस्ट एंडी कोहेन आणि कोल्टन अंडरवुड इत्यादी सेलेब्स कोरोनाशी झुंज देत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.