ETV Bharat / sitara

'इंडियन आयडॉल' : नेहा सायलीला म्हणाली, ‘हे गाणे मी तुझ्यासारखे गाऊच शकले नसते’! - इंडियन आयडॉल १२मध्ये सायली कांबळे

इंडियन आयडॉल १२ या अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो च्या आगामी वीकएंडमध्ये ‘किशोर कुमार्स १०० सॉन्ग्स’ विशेष भाग साजरा होणार आहे. या भागात सगळे स्पर्धक आपल्या गाण्यांतून किशोर कुमारला ‘संगीतांजली’ वाहताना दिसतील आणि परीक्षक हिमेश रेशमिया, नेहा कक्कर, अन्नू मलिक आणि अतिथी गायक अमित कुमार देखील त्यांच्या सूरात सूर मिसळताना दिसतील. या भागात सायली कांबळेने ‘जाने कैसे कब कहां’, ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातों में’ आणि ‘अब के सावन में जी डरे’ ही गाणी म्हटली, ज्याला सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली तसेच परीक्षक आणि अमित कुमार यांनीही तिचे कौतुक केले.

indian-idol-neha-
'इंडियन आयडॉल'
author img

By

Published : May 8, 2021, 10:50 PM IST

भारतामध्ये कानाकोपऱ्यात टॅलेंट सापडते, नृत्यात, गायनात वगैरे. छोट्या पडद्यावरील रियालिटी शो पाहिल्यावर ते सिद्धही होतं. सोनी एंटरटेन्मेन्ट टेलिव्हिजन वर सुरु असलेल्या इंडियन आयडॉल या म्युझिक रियालिटी शोमशील परफॉर्मन्सेस बघितल्यावर खात्री पटते की आपल्या वैविध्यपूर्ण देशात अप्रतिम प्रतिभा आहे. या रियालिटी शोचा हा बारावा सिझन असून आधीच्या सत्रांतून संगीतक्षेत्राला अनेक प्रतिभाशाली गायक, म्युझिक डायरेक्टर्स मिळाले.

इंडियन आयडॉल १२ या अत्यंत लोकप्रिय रियालिटी शो च्या आगामी वीकएंडमध्ये ‘किशोर कुमार्स १०० सॉन्ग्स’ विशेष भाग साजरा होणार आहे आणि या भागाची शोभा वाढवणार आहे, किशोर कुमार यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध गायक अमित कुमार. या भागाचे परीक्षण करतील अन्नू मलिक, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया, तर सूत्रसंचालन करेल आदित्य नारायण. अमित कुमार जेव्हा किशोर कुमारचे गंमतीदार किस्से सांगेल, तेव्हा या कार्यक्रमात हास्याची कारंजी उसळताना दिसतील.

या भागात सगळे स्पर्धक आपल्या गाण्यांतून किशोर कुमारला ‘संगीतांजली’ वाहताना दिसतील आणि परीक्षक हिमेश रेशमिया, नेहा कक्कर, अन्नू मलिक आणि अतिथी गायक अमित कुमार देखील त्यांच्या सूरात सूर मिसळताना दिसतील. या भागात सायली कांबळेने ‘जाने कैसे कब कहां’, ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातों में’ आणि ‘अब के सावन में जी डरे’ ही गाणी म्हटली, ज्याला सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवून दाद दिली तसेच परीक्षक आणि अमित कुमार यांनीही तिचे कौतुक केले.

सायलीच्या गायकीवर आणि आवाजावर नेहा कक्कर भलतीच खुश दिसली. नेहा कक्कर म्हणाली, “मी माझी प्रतिक्रिया सांगण्यापूर्वी तुला विनंती करेन की, ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातों में’ गाण्याच्या त्या दोन ओळी तू मला परत गाऊन दाखव. यावर सायलीने त्या ओळी गायल्या आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. नेहा कक्कर म्हणाली, “सायली, मी आजवर तुझे जे परफॉर्मन्सेस पाहिले आहेत, त्यातला हा एक उत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. आणि मला हे कबूल करावेच लागेल की, हे गाणे मी तुझ्यासारखे गाऊ शकले नसते. तू गायलेस ते अविश्वसनीय होते.”

इंडियन आयडॉल सिझन १२ दर वीकएंडला रात्री सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.