ETV Bharat / sitara

इंडियन आयडॉल १२ च्या मंचावर रंगली इफ्तार पार्टी! - iftar party

मुस्लिम जनतेसाठी पवित्र असणारा रमजानचा महिना सुरु आहे. दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सोडला जातो त्याला इफ्तार म्हणतात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल १२ मध्ये भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले सांगीतिक स्पर्धक आहेत ज्यात काही मुसलमान आहेत. सर्वधर्म समभाव साधत या मंचावर गुणी स्पर्धक दानिश याला आईवडिलांची कमी भासू न देता इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती.

इंडियन आयडॉल
इंडियन आयडॉल
author img

By

Published : Apr 29, 2021, 1:55 PM IST

मुंबई - मुस्लिम जनतेसाठी पवित्र असणारा रमजानचा महिना सुरु आहे. दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सोडला जातो त्याला इफ्तार म्हणतात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल-१२ मध्ये भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले सांगीतिक स्पर्धक आहेत ज्यात काही मुसलमान आहेत. सर्वधर्म समभाव साधत या मंचावर गुणी स्पर्धक दानिश याला आईवडिलांची कमी भासू न देता इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती.

दानिश उफ्तार पार्टी
दानिश उफ्तार पार्टी
दानिशने ‘अय मेरी जोहराजबीं’ आणि ‘चाहुंगा मैं तुझे सांझ सवेरे’ या गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. इंडियन आयडॉलमधल्या या अद्भुत आवाजाच्या स्वामीने, दानिश मोहम्मदने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. परीक्षक आणि सगळ्या स्पर्धकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. अन्नू मलिकने देखील त्याला चार प्रोत्साहक शब्द सांगितले व त्या नंतर त्या सगळ्यांनी एकत्र इफ्तारीचा आनंद लुटला. दानिश पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांच्या गैरहजेरीत असे करत होता. अन्नू मलिक म्हणाला, “दानिश तू म्हणजे हिरा आहेस. तू मंचावर अद्भुत परफॉर्म केलेस. आम्ही सगळे तुझे कुटुंबीयच आहोत आणि या प्रसंगी मी माझ्याकडून तुला भरभरून आशीर्वाद देतो आणि अल्ला तुला जीवनात यश देवो अशी कामना करतो.”
दानिश
दानिश
या विकेंडला सगळ्या गुणी स्पर्धकांचे परफॉर्मन्स या मंचावर आहेत. आपला लाडका आणि मजेशीर होस्ट आदित्य नारायण आपल्या गंमती जमती घेऊन परतणार आहे. आणि संगीतकार अन्नू मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर हे पाहुणे परीक्षक म्हणून येणार आहेत. या वीकएंडमधल्या अप्रतिम परफॉर्मन्सेससह हा शो प्रेक्षकांना आणखी दर्जेदार मनोरंजन देणार आहे.आदित्यने दानिशला विचारले की, त्याला तिच्या कुटुंबाची आज इतकी आठवण का येत आहे, यावर दानिशने उत्तर दिले, “आमच्यासाठी रमझान हा दर वर्षी खूप खास असतो, पण यावेळेस मी त्यांच्यासोबत इफ्तारी करू शकत नसल्याने आज मला त्या सगळ्यांची खूप आठवण येत आहे.” यावर मनोज मुंतशिर म्हणाला, “दानिश आम्ही सगळे तुझे कुटुंबीयच आहोत आणि आज या प्रसंगी तुझ्यासाठी एक सर्प्राइज आहे.” त्यानंतर आपल्यासाठी मंचावर इफ्तारीची व्यवस्था पाहून दानिश भारावून गेला. मागाहून सर्व परीक्षक आणि स्पर्धक यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. सगळ्यांचे हे प्रेम बघून दानिश भावुक झाला होता. ‘इंडियन आयडॉल सिझन १२’ प्रसारित होतो दर वीकेंडला रात्री ९.३० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर. बघायला विसरू नका.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.