ETV Bharat / sitara

अडीच वर्षात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केली तिहेरी शतकपूर्ती!

महाराष्ट्राची हास्यजत्राने नुकताच ३०० भागांचा पल्ला पार केला असून ‘एमएचजे’ टीमने चवथ्या शतकासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. ३०० नाबाद भागांचा एक सुंदर सोहळा प्रेक्षकांना १७-१८ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे आणि या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे सुप्रसिद्ध विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या टीमने.

maharashtrachi-hasyajatra-
महाराष्ट्राची हास्यजत्रा
author img

By

Published : Feb 13, 2021, 1:08 PM IST

हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे सातत्याने हसवणं एक विनोदी कार्यक्रम गेले चार सीजन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना देत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राने नुकताच ३०० भागांचा पल्ला पार केला असून ‘एमएचजे’ टीमने चवथ्या शतकासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ हा कार्यक्रम आपल्या मजेदार आणि दर्जेदार विनोदाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करीत आला आहे. गेल्या वर्षी जेव्हा लोक निराश होते तेव्हा याच कार्यक्रमाने त्यांना टेन्शन विसरण्यास मदत केली. सगळ्यांच्या लाडक्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे ३०० भाग पूर्ण होत आहेत ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली २.५ वर्ष संपूर्ण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.

नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी प्रहसनांचा कार्यक्रम. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं शिवधनुष्य हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने लीलया पेललं आहे. कधी विनोदी तर कधी मार्मिक पद्धतीने प्रेक्षकांना आपले वाटणारे विषय हास्याचे महारथी सादर करतात. विनोदाची पातळी राखून, चिकाटीने इतर कोणावरही व्यंग न करता विनोद करणं या काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आणि प्रसिद्धही झाल्या, या कार्यक्रमासोबत.

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या खुसखुशीत आणि प्रसन्न निवेदनासोबतच तिची ‘वा दादा वा’ ही दिलखुलास दादही लोकप्रिय झाली. सई ताम्हणकरनं कलाकारांच्या केलेल्या निखळ कौतुकसोबत तिची ‘जुजबी’ दाद पण चर्चेत आली. ‘जुजबी’ हा या कार्यक्रमातील परवलीचा शब्द बनला असून ‘एमएचजे’ टीम त्यातून विनोदनिर्मिती करत प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन करतेय. ‘जुजबी’ हा सई ताम्हणकरकडून प्रेमाची पोचपावती मिळणारा शब्द व कृती असून त्यावर निर्माते दिग्दर्शक यांनीसुद्धा मार्मिक टिप्पणी केली होती. अत्यंत सुंदर शब्दांचा फुलोरा रचत प्रसाद ओकने केलेल्या मार्मिक टिपणीसोबत त्याने न दिलेली पार्टीही लोकप्रिय झाली आहे.

३०० नाबाद भागांचा एक सुंदर सोहळा प्रेक्षकांना १७-१८ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे आणि या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे सुप्रसिद्ध विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या टीमनी. मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले.

टेन्शनवरची मात्रा टेन्शनला करते गेट आऊट, महाराष्ट्राची हास्यजत्रा ३०० नॉट आऊट, हा विनोदाचा सोहळा १७ आणि १८ फेब्रुवारीला रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा - ‘गुगल’ ने विद्युत जामवालला बसविले मार्शल आर्टिस्ट ब्रूस लीच्या पंक्तीत!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.