ETV Bharat / sitara

इला अरुण यांना नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करताना वाटत होता 'संशय'!! - दिग्गज गायिका आणि अभिनेत्री इला अरुण

गेली चार दशके सिने पडद्यावर अभिनय करणाऱ्या इला अरुण यांना नवाजुद्दीनसोबत काम करताना सुरुवातीला संशय वाटत होता. मात्र त्याची अभिनय क्षमता पाहून त्या प्रभावित झाल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर २२ मेरोजी रिलीज झालेल्या घुमकेतू चित्रपटात त्या नवाजसोबत झळकल्या आहेत.

Ila Arun
इला अरुण
author img

By

Published : May 22, 2020, 1:12 PM IST

मुंबई - दिग्गज गायिका आणि अभिनेत्री इला अरुण ''घुमकेतू'' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करीत आहेत. गेली चार दशके सिने पडद्यावर अभिनय करणाऱ्या इला यांना नवजुद्दीनसोबत काम करताना सुरुवातीला संशय वाटत होता.

'घुमकेतू' या चित्रपटात नवाजुद्दीन मुख्य भूमिकेत आहे. बिहारमधून मुंबईत अभिनय करण्यासाठी आलेल्या स्ट्रगलिंग अॅक्टरच्या भूमिकेत तो आहे.

"मी अशा कलाकारांपैकी एक नाही ज्यांना असे वाटते की, जास्त काळ काम केल्यामुळे किंवा अनुभव घेतल्यामुळे श्रेष्ठ बनता येते. अभिनयाची शैली विकसित होत आहे, कामगिरी विकसित होत आहे आणि मला समकालिन होण्यासाठी स्वतःमध्ये सतत बदल करावे लागतील. नवाजुद्दीन हा खूप चांगला अभिनेता आहे आणि त्याच्यावर प्रभावित झाले आहे. खरंतर सुरुवातील त्याच्यासोबत काम करताना मी संशय व्यक्त केला होता,'' असे इला अरुण म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या: "तो तरुण आहे, त्याचे मन सावध आहे आणि प्रत्येक दृश्यात तो खास गोष्टीची भर घालतो, ज्यामुळे त्या पात्राला पुढच्या पातळीवर नेले जाते. मी जरी ज्येष्ठ असले तरी त्याच्यासमोर थांबताना मला पायाच्या अंगठ्यावर उभे राहवे लागले. त्याच्याशी अभिनय क्षमतेशी जुळवून घेण्यासाठी सतर्क रहावे लागले.''

पुष्पेंद्र नाथ मिश्रा दिग्दर्शित 'घुमकेतू'मध्ये रागिनी खन्ना, अनुराग कश्यप आणि स्वानंद किरकिरे यांच्याही भूमिका आहेत.

इला अरुण यांनी १९८३ मध्ये श्याम बेनेगलच्या मंडीपासून अभिनय करण्यास सुरुवात केली. अर्ध सत्य, वेलकम टू सज्जनपूर, जोधा अकबर आणि मंटो यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

'घुमकेतू' हा चित्रपट 22 मे 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.