ETV Bharat / sitara

मी पुन्हा येईन, पुन्हा गाईन : अमृता फडणवीसांचा नवा निर्धार

author img

By

Published : Nov 18, 2020, 3:35 PM IST

Updated : Nov 18, 2020, 4:03 PM IST

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेले 'तिला जगू द्या' हे गीत सध्या चर्चेत आहे. या गाण्याचे कौतुक करणाऱ्यांसह टीका करणाऱ्यांचेही स्वागत अमृता फडणवीस यांनी केले आहे. नव्या गाण्यासह पुन्हा परत येत असल्याचे संकेत त्यांनी नव्या ट्विटमधून दिले आहेत.

Amrita Fadnavis
अमृता फडणवीस

मुंबई - अमृता फडणवीस यांचे 'तिला जगू द्या' हे गीत भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झाले होते. टी सिरीजची निर्मिती असलेल्या या गाण्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या गाण्यावरुन अमृता यांच्यावर टीकेची झोडही उठली असली तरी त्यांनी टीका करणाऱ्यांचे आणि कौतुक करणाऱ्यांचे स्वागत केले आहे.

  • Thank you so much for appreciating the Womens’ song- tila jagu dya with views touching 10 lakh in 2 days ! I welcome both appreciation and criticism from you - will soon come back with something new for you !

    — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करुन प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. "तिला जगू द्या या गाण्याचे कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार. या गाण्याला २ दिवसात १० लाख व्यूव्ह्ज मिळाले आहेत!! या गाण्याचे कौतुक करणाऱ्या आणि टीका करणाऱ्यांचे स्वागत मी स्वागत करते. लवकरच काही तरी नवीन घेऊन परत येत आहे!", अशा आशयाचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा नव्या गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीस येतील हे नक्की.

हेही वाचा - ''मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन'' : महेश टिळेकरांची अमृता फडणवीसांच्या गायनावर जोरदार टीका

अमृता फडणवीस यांनी गायलेल्या 'तिला जगू द्या' या गाण्याची ही बातमी प्रसिध्द होत असताना १२ लाख, ३३ हजार ४४१ व्ह्यूव्हज मिळाले आहेत. यामध्ये १९०० लोकांनी याला लाईक केले असून १८ हजार लोकांनी डिसलाईक केले आहे.

हेही वाचा - नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा हनिमून फोटो अल्बम सोशल मीडियावर

टी सिरीजने निर्मिती केलेल्या 'तिला जगू द्या' या गाण्याला संगीत श्रीरंग उर्हेकर यांनी दिले असून अमृता फडणवीस यांनी गाणे गायले आहे. या गाण्याचे बोल प्राजक्ता पटवर्धन यांचे आहेत. संगीत संयोजन अनय गाडगीळ यांनी केले आहे.

Last Updated : Nov 18, 2020, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.