मुंबईः हृदयविकाराच्या झटक्यानंतर येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झालेल्या नृत्यदिग्दर्शक-निर्माते आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
"डान्स इंडिया डान्स" या रिअॅलिटी शोचा परिक्षक असलेल्या ४६ वर्षीय दिग्दर्शक रेमो डिसूझाला ११ डिसेंबर रोजी कोकिलाबेन रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केले होते.
रेमोने इन्स्टाग्रामवरुन आपल्याला डिस्चार्ज मिळाल्याचे चाहत्यांना कळवले आहे. आपल्यावर प्रेम केलेल्या आणि बरे होण्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे त्याने आभार मानले आहे.
'तुम बीन', 'कांटे', 'धूम', 'रॉक ऑन' आणि "ये जवानी है दिवानी" सारखे चित्रपट कोरिओग्राफ करणारा डिसूझा बॉलिवूडमधील आघाडीच्या नृत्यदिग्दर्शकांपैकी एक आहे.
हेही वाचा - सलोनी गौरच्या नव्या 'रनआऊट' व्हिडिओवर कंगना भडकली
दिग्दर्शक म्हणून त्याने "एफ.ए.एल.टी.यू.", "एबीसीडी", "ए फ्लाइंग जट्ट" आणि "रेस 3" असे चित्रपट केले आहेत.
हेही वाचा - 'जुग जुग जीयो'च्या सेटवर कियाराला भेटला कोरोनामुक्त झालेला वरुण धवन