ETV Bharat / sitara

हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी राज ठाकरेंची घेतली भेट - ‘मन उडू उडू झालं’

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा अनुभव खूपच अविस्मरणीय असल्याची भावना दोन्ही कलाकारांनी व्यक्त केली.

हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत
हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत
author img

By

Published : Nov 5, 2021, 7:49 PM IST

‘फुलपाखरू’ मधून महाराष्ट्राची लाडकी झालेली हृता दुर्गुळे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवतेय. नुकत्याच सुरु झालेल्या मन उडू उडू झालं मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलीय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तरुणाईच्या हृदयावर राज्य करतेय. तिच्या सोबतीला आहे अजिंक्य राऊत, जो सुद्धा अनेक युवतींच्या हृदयाची धडकन आहे. हे दोघेही एकत्रितपणे मराठी प्रेक्षकांना आनंद वाटताहेत. नुकतीच या तरुण ‘जोडप्याने’ महाराष्ट्रातील बेधडक आणि निर्भय विधाने व क्रिया करण्यास न कचरणाऱ्या नेत्याची भेट घेतली. या भेटीचा अनुभव खूपच अविस्मरणीय असल्याची भावना दोन्ही कलाकारांनी व्यक्त केली.

हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत
हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत

संपूर्ण महाराष्ट्राचं मन सध्या उडू उडू झालं आहे कारण झी मराठीवरील नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला मन उडू उडू झालं हा कार्यक्रम आणि त्यातील व्यक्तिरेखा त्यांच्या आवडीच्या बनल्या आहेत. कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे. इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावतेय. अशातच इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी एका आघाडीच्या नेत्याची भेट घेतली.

संपूर्ण मुंबईभरात प्रचलित, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित लोकप्रिय कार्यक्रम 'दीपोत्सव' दरवर्षप्रमाणे यंदाही 'शिवतीर्थ' (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे संपन्न झाला. ऋता आणि अजिंक्य यांच्या सोबतच शर्मिला राज ठाकरे, अमित ठाकरे - मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्याचवेळी ऋता आणि अजिंक्य यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत
हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत

अजिंक्य राऊत म्हणाला, "मन उडू उडू झालं ही मालिका आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेवर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेम करत आहेत. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहोत आणि त्यामुळेच आम्हाला आज या मान्यवरांच्या उपस्थितीत दीपोत्सव या सोहळ्याला येण्याचा बहुमान मिळाला यासाठी मी खरंच खूप आनंदी आहे. राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता असं मी म्हणेन."

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून महाराष्ट्राची लाडकी झालेली जोडी हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा - 'वागले की दुनिया नयी पीढी नये किस्‍से'च्‍या सेटवर धमाल दिवाळी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.