ETV Bharat / sitara

भाऊ कदम व संदीप पाठक अभिनित हॅारर कॅामेडी चित्रपट ‘बेनवाड’! - हॅारर कॅामेडी चित्रपट बेनवाड

चित्रपटगृहे अजूनही ५०% क्षमतेने उघडी असल्यामुळे प्रेक्षकांचा मनोरंजनासाठीचा भर टेलिव्हिजनवर असतो. झी टॉकीज ओरिजिनलचा ‘बेनवाड’ हा चित्रपट शीर्षकापासून कथानकापर्यंत आणि अभिनयापासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाबींमध्ये कुतूहल जागवणारा आहे. येत्या रविवार १३ फेब्रुवारीला हा चित्रपट झी टॉकीजवर प्रसारित होणार आहे.

भाऊ कदम व संदीप पाठक
भाऊ कदम व संदीप पाठक
author img

By

Published : Feb 11, 2022, 7:18 PM IST

मुंबई - चित्रपटगृहे अजूनही ५०% क्षमतेने उघडी असल्यामुळे प्रेक्षकांचा मनोरंजनासाठीचा भर टेलिव्हिजनवर असतो. झी टॅाकीज नेहमीच रंगतदार चित्रपट घेऊन येण्यासाठी प्रसिद्ध आहे. टॅाकीज ओरिजिनलच्या माध्यमातून झी टॅाकीजने आजवर दर्जेदार चित्रपटांची मेजवानी आपल्या रसिकांना दिली आहे. सध्याचा प्रेक्षक चोखंदळ झालाय आणि त्याला निरनिराळ्या ‘जॉनर’ चे चित्रपट हवे असतात. हल्ली हॅारर कॅामेडी चित्रपट प्रेक्षकांना पाहायला अधिक आवडतात. हे लक्षात घेऊन याच पठडीतला टॅाकीज ओरिजिनलचा ‘बेनवाड’ हा नवा हॅारर कॅामेडी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन दिग्गज कलाकार एकत्र झळकणार आहेत. आजचा आघाडीचा विनोदवीर भाऊ कदम आणि त्याच्या तोडीस तोड असणारा संदीप पाठक 'बेनवाड' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

भाऊ कदम व संदीप पाठक
भाऊ कदम व संदीप पाठक

एखाद्या गावाच्या किंवा शहराच्या बाबतीतही काही दंतकथा असतात. बेनवाड हे असंच एक आगळं वेगळं नाव असलेलं गाव. या गावाची पण एक दंतकथा आहे. हे गाव एका विचित्र अशा शापात अडकले आहे. याच गावात संज्या आणि रंज्या हे दोन इरसाल भाऊ रहात असतात. संज्या आणि रंज्याच्या रूपात भाऊ कदम आणि संदीप पाठक प्रेक्षकांना भेटणार आहेत. बेनवाड गावाच्या रक्षणाची जबाबदारी संज्या आणि रंज्या यांच्याकडं सोपवण्यात येते. गावाला असलेल्या शापातून ते गावाची सुटका करू शकणार की नाही याची मजेशीर ‘रोलर कोस्टर राईड’ म्हणजे बेनवाड चित्रपट. दिग्दर्शक सुमित संघमित्र यांनी हे गुपित मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

भाऊ कदम व संदीप पाठक
भाऊ कदम व संदीप पाठक

'बेनवाड' मध्ये संज्या आणि रंज्या या दोन इरसाल व्यक्तिरेखा असून या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना प्रथमच भाऊ आणि संदीप या जोडीची अनोखी केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. भूतकाळाच्या खुणा दाखवत वर्तमानकाळात गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचा शोध घेऊ पहाणारा ‘बेनवाड’ हा हॅारर कॅामेडी चित्रपट असून आमच्या दोघांची वेगळी धमाल केमिस्ट्री यातून प्रेक्षकांना दिसेल, असं भाऊ कदम आणि संदीप पाठक सांगतात. या दोघांसोबत त्यांच्या नायिकाही या चित्रपटात धमाल करताना दिसणार आहेत.

झी टॉकीज ओरिजिनलचा ‘बेनवाड’ हा चित्रपट शीर्षकापासून कथानकापर्यंत आणि अभिनयापासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाबींमध्ये कुतूहल जागवणारा आहे. प्रेक्षकांना एका मनोरंजक सफरीवर घेऊन जाणार हा चित्रपट असून या प्रवासात प्रेक्षकांना भाऊ कदम, संदीप पाठक, कृतिका तुळसकर, राधा सागर, विजय निकम, शुभांगी भुजबळ, विजय पाटकर, संतोष शिंदे, रुक्मिणी सुतार, माधव अभ्यंकर, रमेश वाणी आदी कलाकार भेटणार आहेत.

येत्या रविवार १३ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वा. आणि सायं. ६.०० वा. प्रेक्षकांना झी टॅाकीजवर दिसणारी 'बेनवाड' गावाची मजेशीर सफर अनुभवता येईल.

हेही वाचा - Bajiprabhu's Struggle Pavankhind: योद्धा बाजीप्रभूंची झुंज दिसणार 'पावनखिंड' मध्ये!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.