मुंबई - बिग बॉस १३ चा स्पर्धक असिम रियाजचे फॅन्स फॉलोविंग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शोच्या फिनालेला अद्याप १० दिवस बाकी आहेत. प्रत्येक स्पर्धक विजयी होण्यासाठी मेहनत घेत आहेत. अशातच डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन आणि हॉलिवूड स्टार जॉन सीनाने असिम रियाजचा फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जॉन सीनाने रियाजच्या फोटोला त्याने कोणतीही कॅप्शन दिलेली नसली तरी असिमच्या फॅन्सचा आनंद गगनाला भिडला आहे. असिमच्या फॅन्सना वाटत आहे की, त्याने हा फोटो त्याच्या सपोर्टमध्ये पोस्ट केला आहे.
जॉन सीना जेव्हा एखदाद्याचा फोटो पोस्ट करतो तेव्हा त्यामागे काही लॉजिक असतेच असे नाही. मजेशीर गोष्ट म्हणजे असिमचा फोटो शेअर केल्यानंतर काही जणांनी जॉन सीनाचे इन्स्टाग्राम हॅक झाल्याचा दावा केलाय. मात्र, १६ फेब्रुवारीला होणाऱ्या बिग बॉसच्या फिनालेमध्ये असिम विजेता होण्यास जॉन सीनाच्या पोस्टचा फायदा होईल, असा कयास त्याचे फॅन बांधत आहेत.