यावर्षी २१ जून २०२१ रोजी जागतिक संगीत दिन जगभरात साजरा केला जात आहे. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री जॅक लँग आणि फ्रेंच संगीतकार मॉरिस फ्लेरेट यांनी एकत्रितपणे ‘वर्ल्ड म्युझिक डे’ साजरा करण्याची संकल्पना मांडली आणि हा दिवस सर्वप्रथम १९८२ मध्ये साजरा करण्यात आला. फ्रेंचमध्ये 'फेट डी ला म्यूझिक' आणि ‘मेक म्युझिक डे म्हणून देखील ओळखला जातो.
संगीतामध्ये ऊर्जा असते, शक्ती असते जी नकारात्मकतेवर मात करू शकते. सध्याच्या कोरोना काळात सर्वत्र निगेटिव्हिटी पसरलेली असताना संगीताने ती नक्कीच दूर होऊ शकेल. भारतामध्ये तर संगीत प्रत्येकाच्या नसानसात भिनलेलं आहे. कुठलाही सण अथवा कार्यक्रम संगीताशिवाय अपुरा समजला जातो. चित्रपट संगीत जरी खूप लोकप्रिय असले तरी हल्ली ‘सिंगल्स’ ना सुद्धा महत्व आलेय आणि बरीच नावाजलेली सांगीतिक मंडळी हा ‘जॉनर’ पडताळून पाहताना दिसताहेत. त्यातीलच एक म्हणजे सुप्रसिद्ध गायिका शिबानी कश्यप.
शिबानी कश्यप म्हणाली की, "संगीत हा शब्द आशा, भावना आणि आठवणींत रमलेल्यांना भूतकालीन जीवनाविषयीची ओढ अनुनादित करतो. माझं स्वतःचं ‘जोगिया’ नावाचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. हे एक पंजाबी गाणे खूप प्रेमाने बनविलं आहे. तुम्हा सर्वांना ते नक्कीच आवडेल. जगभरातील अनेक संगीत प्रेमींसाठी हा विशेष दिवस आहे. हा दिवस जगभरातील संगीतकारांचा आणि गायकांच्या योगदानाचा सन्मान करतो. संगीतातील विविध शैलींचे अस्तित्व केवळ विविधता दर्शवित नाही तर ते ज्या ठिकाणाहून अस्तित्त्वात आले आहे त्या इतिहासाची आणि संस्कृतीही प्रतिबिंबित करतात. जागतिक संगीत दिनानिमित्त अशा प्रकारची सांगीतिक देवाण घेवाण जागतिक शांततेला हातभार लावेल.”
ती पुढे म्हणाली, “तसंच अफसाना खान आणि हार्दिक संधू यांचे ‘तितलीयां’, दुआ लीपाचे ‘नव रुल्स’, आणि ‘इंग्लिश मॅन इन न्यूयॉर्क बाय स्टिंग्स’ आणि अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘फिर ले आय दिल’ ही माझी आवडती गाणी आहेत. तुम्हा सर्वांना ‘हॅपी वर्ल्ड म्युझिक डे’.”
गायिका आणि म्युझिशियन शिबानी कश्यपने सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या फोटोंवर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर केवळ स्मृतीचीच चर्चा