मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आगामी चित्रपट 'घूमकेतू' डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन रिलीज होणार आहे. झी ५च्या माध्यामातून याचे स्ट्रीमिंग ओटीटीवर होणार आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता थेट डिजीटल माध्यमातून रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे. त्यामुळे चित्रपट चाहत्यांना घराबाहेर न जाता नवाजचा नवा चित्रपट पाहाता येणार आहे.
-
IT'S OFFICIAL... #Ghoomketu - starring #NawazuddinSiddiqui - will release directly on #OTT [#ZEE5] on 22 May 2020... The feature film - revolving around a struggling writer - has special appearances by #AmitabhBachchan, #RanveerSingh, #SonakshiSinha and several prominent names. pic.twitter.com/0y28fMmyJE
— taran adarsh (@taran_adarsh) May 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... #Ghoomketu - starring #NawazuddinSiddiqui - will release directly on #OTT [#ZEE5] on 22 May 2020... The feature film - revolving around a struggling writer - has special appearances by #AmitabhBachchan, #RanveerSingh, #SonakshiSinha and several prominent names. pic.twitter.com/0y28fMmyJE
— taran adarsh (@taran_adarsh) May 9, 2020IT'S OFFICIAL... #Ghoomketu - starring #NawazuddinSiddiqui - will release directly on #OTT [#ZEE5] on 22 May 2020... The feature film - revolving around a struggling writer - has special appearances by #AmitabhBachchan, #RanveerSingh, #SonakshiSinha and several prominent names. pic.twitter.com/0y28fMmyJE
— taran adarsh (@taran_adarsh) May 9, 2020
पुष्पेंद्र नाथ मिश्रा यांनी दिग्दर्शित केलेला 'घूमकेतू' हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे. यात नवाजुद्दीन एका लेखकाची भूमिका साकारत आहे. मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करणाऱ्या लेखकाची ही व्यक्तीरेखा आहे.
या सिनेमात अनुराग कश्यप याचीही एक भूमिका आहे. याशिवाय इला अरुण, रघुबीर यादव, स्वानंद किरकिरे आणि रागिनी खन्ना यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. अमिताभ बच्चन रणवीर सिंह आणि सोनाक्षी सिन्हा यात पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत.
हा चित्रपट थिएटमध्ये रिलीज होणार नसून झी ५ च्या माध्यमातून ओटीटीवर याचे प्रसारण होणार असल्याचे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करीत सांगितले आहे. २२ मे रोजी याचे प्रसारण होणार असल्याचा खुलासाही ट्विटमधून करण्यात आलाय.