ETV Bharat / sitara

'गाथा नवनाथांची' मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार!

'गाथा नवनाथांची' या मालिकेतून आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला असून या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे.

author img

By

Published : Jun 16, 2021, 8:16 PM IST

gatha-navanathanchi
'गाथा नवनाथांची'

आपला समाज पापभिरू असून श्रद्धेवर विसंबून असतो. लॉकडाऊनच्या काळात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या तीसेक वर्ष जुन्या मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आताही अनेक वाहिन्यांवर पौराणीक मालिका सुरु आहेत ज्या प्रेक्षकांना आवडताहेत. त्यात भर पडतेय सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेची. महाराष्ट्रातील प्रेक्षक सध्या श्रद्धा आणि भक्ती यावर आधारित मालिकांना पाठिंबा देताना दिसताहेत. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे.

मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना नाही. त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 'गाथा नवनाथांची' या मालिकेतून आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला असून या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे.

gatha-navanathanchi
'गाथा नवनाथांची' टीव्ही मालिका

कलियुगात जेव्हा असुरी शक्ती मनुष्यावर वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. काही प्रसंगांसाठी ‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत व्हीएफएक्सचा वापर फार कमी प्रमाणात केला जातो. त्यामुळे या मालिकेतील व्हीएफएक्स हा एक महत्त्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे.

अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हानात्मक आहे असे निर्मात्यांचे मत आहे. येत्या २१ जूनपासून 'गाथा नवनाथांची' ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - ‘रामायण’ मालिकेतील 'आर्य सुमंत' ज्येष्ठ अभिनेता चंद्रशेखर कालवश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.