मुंबई - अभिनेता आणि लेखक झिशान काद्री याच्या अडचणीत भर पडली आहे. मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात एफआयआर नोंद केली आहे. झिशानच्या सहनिर्मात्यानेच त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. फसवणुक केल्या प्रकरणी झिशानच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा - रकुलप्रीत सिंहने फ्लाईंग बोर्डवरील फोटो केले शेअर, चाहत्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद
झिशान काद्री बनवत असलेल्या वेब सिरीजसाठी निर्मात्याने आणि त्याच्या मित्राने दिड कोटी रुपये झिशानला दिले होते. ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार होती. मात्र यात फसवणुक झाल्याचे तक्रार करणाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - अमिताभ यांनी पोस्ट केला कधीही न बनलेल्या चित्रपटाचा फोटो