ETV Bharat / sitara

रॉचे संस्थापक आरएन काव यांच्यावर बनणार वेबसिरीज आणि सिनेमा, मुख्य भूमिकेत नाना पाटेकर

author img

By

Published : Jul 8, 2020, 1:33 PM IST

भारताची बाह्य इंटेलिजेंस एजन्सी रिसर्च अॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग (रॉ) चे संस्थापक, दिग्गज स्पायमास्टर रामेश्वर नाथ काव यांच्या जीवनावरील एक वेब सिरीज तसेच एक चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. चित्रपटाचे निर्माता फिरोज नाडियाडवाला म्हणाले की, मी पाच वर्षांपासून मालिकेवर काम करत आहे आणि ते निर्विवादपणे तयार केले जाईल. रामेश्वर नाथ काव यांच्या जीवनावरील या कलाकृतीसाठी निर्मात्यांनी नाना पाटेकरशी संपर्क साधला आहे.

Nana Patekar in titular role
मुख्य भूमिकेत नाना पाटेकर

मुंबई - भारतीय बाह्य गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) चे संस्थापक दिग्गज स्पायमास्टर रामेश्वर नाथ काव यांच्या जीवनावर एक वेब सीरिज तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बनवित असल्याचे चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितले.

नाडियाडवाला म्हणाले की, ते पाच वर्षांपासून मालिकेवर काम करत आहेत आणि त्याची उत्तम निर्मिती होईल.

"आम्ही पाच वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहोत. ही अशी कथा आहे जी सर्वांना पाहायला आवडेल. आम्ही पहिल्यांदाच अशी मालिका बनवत आहोत, याचे २० एपिसोड्स असतील. त्यासाठी दोन प्रमुख प्रवाहात असलेल्या प्लॅटफॉर्मवर आम्ही चर्चा करत आहोत,'' असे नाडियाडवाला यांनी सांगितले.

हेही वाचा - ब्रॅड पिट झळकणार आगामी 'बुलेट ट्रेन' चित्रपटात

''वेब सिरीजसोबत त्याच कलाकारांच्यासोबत चित्रपटाची निर्मितीही समांतरपणे केली जाणार आहे. हा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे केवळ संशोधनातच नव्हे तर नियोजन व अंमलबजावणीसाठीही बराच वेळ लागला आहे,'' असे नाडियाडवाला म्हणाले.

ते म्हणाले की,"आमच्याकडे नाना पाटेकर स्पायमास्टर रामेश्वर नाथ काव भूमिका साकारत आहेत. आम्ही इतर कलाकारांशी बोलतोय. या मालिकेच्या कलाकार आणि क्रू यासंबंधीची घोषणा लवकरच केली जाईल."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.