मुंबईः दिग्दर्शिका आणि प्रसिध्द कोरिओग्राफर फराह खानने सोमवारी आपल्या 12 वर्षाच्या मुलाने सादर केलेले कोरोनावर आधारित रॅप साँग सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे हे गाणे फराहच्या तिन्ही मुलांनी मिळून बनवलंय.
फराह खान आणि शिरीष कुंदर यांना तीन मुले आहेत. यांचा जन्म एकाच दिवसांचा आहे. या तिळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ दोघेही सोशल मीडियावर नेहमी शेअर करीत असतात. आज आपल्या मुलांनी शेअर केलेले रॅप साँग शेअर करताना दोघाही आई वडिलांना अभिमान वाटत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कोरोना व्हायरसचा प्रार्दुर्भाव असल्यामुळे घरीच थांबा असा संदेश देणारे हे गीत फराहचा मुलगा झार कुंदर यांने लिहिलंय आणि गायलंयदेखील त्यानेच. 'नीड टू सर्वाइव्ह' अशे शीर्षक असलेले हे रॅप साँग सध्या व्हायरल झालंय.
विशेष म्हणजे फराहची मुलगी दिवा हिने या गाण्याचे दिग्दर्शन केलं असून याची स्टाईल फराहची दुसरी मुलगी अन्या हिने केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांकडून या रॅपचे कौतुक झाले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दिग्दर्शक झोया अख्तर, अभिनेत्री सोनम कपूर, सोनाली बेंद्रे यांच्यासह रॅपचे कौतुक करणारे इतर सेलिब्रिटी आहेत.