ETV Bharat / sitara

टी.व्ही. मालिकांमधून प्रचार करणाऱ्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस - tula pahte re

मालिकांमधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे

निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस
author img

By

Published : Apr 10, 2019, 10:18 AM IST

मुंबई - दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध सरकारी योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल आता राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. यासोबतच असा प्रचार करणाऱ्या झी टीव्ही आणि अँड टीव्हीवरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

झी आणि अँड टीव्हीवरील मालिकांमधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे. असा प्रचार करणाऱ्या या दोन्ही वाहिन्यांवरील संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना २४ तासात त्यांचे म्हणणे मांडण्यास या नोटीसद्वारे सांगितले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

निर्मात्यांना निवडणूक आयोगाची नोटीस

अँड टीव्हीवरील भाभीजी घर पर हैं तर झी टीव्हीवरील तुला पाहते रे या मालिकांमधून भाजपच्या सरकारी योजनांचे गुणगान गाण्यात आले होते. मालिकेच्या याच भागांवर अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. यासोबतच झी आणि अँड टीव्हीचे प्रक्षेपण थांबवा आणि भाजपचा प्रचार करणाऱ्या मालिकांवर कारवाई करा, अशी मागणीही काँग्रेसने केली होती.

Intro:प्रचार करणाऱ्या टीव्ही मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाचा दट्टया,चोवीस तासात खुलासा करण्याचे आदेश

मुंबई 9

काही हिंदी तसेच मराठी मालिकांमधून भाजपचा प्रचार हिट असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारी ची गंभीर दखल घेत, त्या मालिकांच्या निर्मात्यांना करणे दाखवा नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे.

गेल्या काहीं दिवसातल्या मालिकांच्या भागात सरकारच्या योजनांचा हेतू पुरस्सर उल्लेख करण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. भाजप सरकारने योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता टीव्ही मालिकांचा आधार घेतला आहे. या मालिकांमध्ये 'भाभीजी घर पर है,' आणि ‘तुझसे है राबता’ या हिंदी मालिकांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले होते.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या बाबतची तक्रार केली होती. टीव्ही मालिकांमधून प्रचार करून भाजपने आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून प्रचारासाठी हीन पातळी गाठल्याचा आरोप सावंत यांनी केला होता. दरम्यान या तक्रारीची निवडणूक आयोगाने अतिशय गंभीर दखल घेतली असून संबंधित निर्मात्यांना नोटीस दिली असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली. येत्या 24 तासात या निर्मात्यांनी नोटीसीला योग्य उत्तर न दिल्यास आचार संहिता भंग च्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितलेBody:......Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.