मुंबई - अल्ट बालाजी आणि ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर येत्या ६ जूनला दुपारी १२पासून हा तिसरा सिझन प्रसारित केला जाणार आहे. मात्र त्याआधी, प्रेक्षकांना एक अनोखा यू-ट्यूब प्रीमियर 'ओ मेरे हमसफर' हा डिजिटल कॉन्सर्ट पहायला मिळणार आहे. 'ओ मेरे हमसफ़र' असे या डिजिटल कॉन्सर्टचे नाव असून त्याचा प्रीमियर 26 मेला संध्याकाळी 5 वाजता अल्टबालाजीच्या यू-ट्यूब पेजवर होईल.
या यू-ट्यूब प्रीमियरचे यजमानपद भूषवणार आहेत गायक, टेलीव्हिजन अँकर आणि ऑल एफएम रेनबो रेडियो जॉकी, मिहिर जोशी. या अनोख्या प्रीमियरची सुरुवात आधीच्या दोन सीझनच्या प्रवासाने होईल, जो प्रेक्षकांच्या मनात 'कहने को हमसफ़र हैं' च्या जुन्या आठवणी ताज्या करतील.
याविषयी बोलताना, एकता कपूर हिने सांगितले, “ओ मेरे हमसफ़र प्रेक्षकांसाठी हा एक अनोखा प्रीमियर घेऊन येत असून 'कहने को हमसफ़र हैं'च्या संगीतमय प्रवासाचे दर्शन घडवेल. शोमधील कलाकारांसोबत अभिजीत सावंत, ऐश्वर्या मजुमदार आणि प्रतिभा सिंह यांच्यासारखे गायक त्यांची काही लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण देखील करतील. हा संगीतमय प्रवास निश्चितच प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अशी सांगीतिक मेजवानी ठरेल. या यू-ट्यूब प्रीमियर कॉन्सर्टमध्ये शोमधील कलाकार रोनित रॉय, गुरदीप पुंज, मोना सिंह, अपूर्वा अग्निहोत्री, पलक जैन आणि पूजा बनर्जी यांच्यासोबत गप्पांची छान मैफिलदेखील रंगणार आहे. लॉकडाउनमध्ये पार पडणाऱ्या या कॉन्सर्टसाठी शोच्या कलाकारांनी आपापल्या घरात सुरक्षित राहून व्हिडिओ रिकॉर्ड केले असून, प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. त्यामुळे शोच्या तिसऱ्या भागच लॉंचिगदेखील चांगलंच संस्मरणीय ठरेल, यात काहीही शंका नाही.