ETV Bharat / sitara

कोरोना फटका: ठाण्यातील नाट्यगृहे बंद... दोनच दिवसात अडीच लाखांचे नुकसान

ठाणे महापालिकेने कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ.काशिनाथ घाणेकर ही नाट्यगृहे पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोनच दिवसात तब्बल अडीच लाखांच्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागले आहे. किंबहुना,कार्यक्रम रद्द झाल्याने रसिकांचाही हिरमोड झाला आहे.

drama-theatesrs-closed
पालिकेचे लाखोंचे नुकसान
author img

By

Published : Mar 16, 2020, 8:34 PM IST

ठाणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे टाळण्यासह सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. त्यानंतर ठाणे महापालिकेने राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ.काशिनाथ घाणेकर ही नाट्यगृहे पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शनिवार व रविवारचे प्रयोग झाले नाहीत. त्यामुळे दोनच दिवसात तब्बल अडीच लाखांच्या उत्पन्नावर पालिकेला पाणी सोडावे लागले आहे. किंबहुना, कार्यक्रम रद्द झाल्याने रसिकांचाही हिरमोड झाला आहे.

ठाण्यातील नाट्यगृहे बंद, दोनच दिवसात अडीच लाखांचे नुकसान

हेही वाचा- कोव्हीड-19 : राज्यभरात एकूण ३७ रुग्ण, कोरोना चाचण्यांसाठी बुधवारपासून कस्तुरबा रुग्णालयात अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित होणार

कोरोनाच्या धास्तीने जगभरात खळबळ उडाली असताना राज्यातही याचे पडसाद उमटत आहेत. त्यानुसार राज्य सरकारने खबरदारारीचे उपाय म्हणून गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना संबंधित प्राधिकरणांना दिल्या. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानेही ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ.घाणेकर नाट्यगृह बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतेही नाट्यप्रयोग अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.

शुक्रवार व शनिवारी या दोनच दिवसात गडकरी रंगायतनमधील रद्द झालेल्या पाच प्रयोगांमुळे १ लाख ३४ हजार ४९६ आणि डॉ.घाणेकर नाट्यगृहात ११ प्रयोग रद्द झाल्याने १ लाख ४३ हजार ५९५ रुपयांचे नुकसान महापालिकेला सोसावे लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.