पुणे - गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट जवळ आल्याचं दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगत जनतेचे आभार मानले.
काही चुकलं, राहिलं असेल तर माफ करा, असे म्हणत कोल्हेंना यावेळी अश्रू अनावर झाले.. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या वढू बु, येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. दरम्यान मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास मांडला तो तसाच पुढील ३५० पेक्षा जास्त वर्ष माणसांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.