नवी दिल्ली - मॉडेल अभिनेत्री डायना पेंटी म्हणते की आजकालच्या काळात बहुतेक गोष्टी डिजिटल पद्धतीने घडत असताना लोक ऑनलाईनकडे वळत आहेत, त्यामुळे फॅशन शोमध्येही याचा विचार केला जाऊ शकतो.
लॅक्मे फॅशन वीकच्या डिजिटल आवृत्तीत डिझायनर दिशा पाटील यांच्या व्हर्च्युअल रॅम्पवॉकमध्ये भाग घेणारी डायना फॅशन इव्हेंटच्या या बदलत्या स्वरुपाविषयी बोलली.
डिजिटल फॅशन शोसाठी रॅम्प वॉकचा अनुभव कसा होता असा प्रश्न डायनाला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना ती म्हणाली,''अनुभव खूप वेगळा होता. येणाऱ्या काळात आम्हाला त्याची सवय करावी लागेल. अर्थात, शो स्टॉपर असल्याने आपल्याकडे थेट प्रेक्षकांची उपस्थिती असेल, परंतु हे नवीन स्वरूपही खूप सोपे आणि प्रभावी आहे आणि त्यासाठी वेळेचीही खूप बचत होते."
भविष्यातही असे होण्याची शक्यता आहे का? यावर डायना म्हणते, "हो, मला वाटतं की भविष्यातही हे चालू राहू शकेल आणि लोक ऑनलाइन फॅशन शो पाहण्याची सवय लावतील, म्हणून कदाचित हे फॅशन उद्योगाचे भविष्य असेल. "