ETV Bharat / sitara

८ वर्षांनी शिवानी रांगोळेने सादर केला नृत्याविष्कार! - कथ्थक नृत्यात शिवानी रांगोळे प्रविण आहे

अभिनेत्री शिवानी रांगोळे नृत्य विशारद आहे. ती कथ्थक शिकली असून गेल्या बऱ्याच वर्षांत व्यावसायिकदृष्ट्या तिला नृत्य करण्याची संधी मिळाली नाही. परंतु आता तब्बल ८ वर्षांनंतर शिवानी ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या सीनसाठी नृत्य करताना दिसणार आहे.

Shivani Rangole
शिवानी रांगोळे
author img

By

Published : Mar 11, 2021, 1:41 PM IST

मुंबई - आपले अनेक अभिनेते-अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त इतर कलांमध्येही प्रवीण असतात. आता अभिनेत्री शिवानी रांगोळेचंच बघाना. ही गुणी अभिनेत्री नृत्य विशारद आहे. ती कथ्थक शिकली असून गेल्या बऱ्याच वर्षांत व्यावसायिकदृष्ट्या तिला नृत्य करण्याची संधी मिळाली नाही. परंतु आता तब्बल ८ वर्षांनंतर शिवानी ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या सीनसाठी नृत्य करताना दिसणार आहे.

कथ्थक नृत्यात शिवानी रांगोळे प्रविण आहे
शिवानी कथ्थक शिकली असली तरी तिची नृत्याची ही आवड काहीशी मागे पडली होती. ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने जवळपास ८ वर्षांनी तिने नृत्य सादर केलं. मालिकेतली तिची सहकलाकार सानिया चौधरीने या खास गाण्याची कोरिओग्राफी केली होती. या गाण्यावर नृत्य करताना अतिशय आनंद झाल्याची भावना शिवानीने व्यक्त केली. ‘सांग तू आहेस का’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वैभवीला जीवानीशी मारल्यानंतर आता सुलक्षणा स्वराज आणि डॉ. वैभवीच्या देखिल जीवावर उठली आहे. या कठीण काळात वैभवी स्वराजचा जीव कसा वाचवणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस का’ मालिकेचं उत्कंठावर्धक कथानक आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेच्या एका खास सीनच्या निमित्ताने नुकतंच अभिनेत्री शिवानी रांगोळेने एका सदाबहार गाण्यावर नृत्य सादर केलं. ते पाहायला मिळेल ‘सांग तू आहेस’ मालिकेत जी स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

हेही वाचा - आमिर खानचे ‘आयटम सॉंग’, एली अवराम सोबत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.