मुंबई - टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलाइक या महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधित झाली होती. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कुटुंबीय आणि चाहत्यांनी तिच्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळे ती भावूक झाल्याचे व्हिडिओत दिसते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
१ मे रोजी रुबिनाने आपली कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे चाहत्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून कळवले होते. हिमाचल प्रदेश येथील आपल्या गावी शिमला येथे कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या रुबिनाने कोरोना व्हायरसशी मुकाबला केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रुबिना व्हायरसपासून मुक्त झाल्यानंतर तिच्या शिमला डायरीतून काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने आपला कोविड रिकव्हरीचा प्रवास पूर्णपणे अश्रू, कृतज्ञता, प्रेम आणि उपचार यांचा होता असे म्हटलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास होतेय वारंवार गौरवांकित, देशालाबद्दल वाढवतेय अभिमान!