ETV Bharat / sitara

'सूर नवा ध्यास नवा' च्या मंचावर राहुल देशपांडे, महेश काळे पहिल्यांदाच एकत्र - महेश काळे

येत्या आठवड्यामध्ये शास्त्रीय संगीतातील दोन हिरे प्रथमच 'सूर नवा, ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या मंचावर एकत्र दिसणार असून या कार्यक्रमात त्यांची जुगलबंदी रंगणार आहे

सूर नवा ध्यास नवा
author img

By

Published : Nov 24, 2019, 8:16 PM IST

मुंबई- 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर प्रेक्षकांना अनेकदा महेश काळे यांनी सादर केलेल्या गाण्यांचा नजराणा मिळाला आहे. त्यांच्या गायकीने आपल्याला अनेकदा सुखद अनुभव दिला आहे. पण येत्या आठवड्यामध्ये मात्र सूर नवा, ध्यास नवा या मंचावर रंगणार आहे शास्त्रीय सुरांची खास जुगलबंदी.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर शास्त्रीय संगीतातील ज्या दोन हिर्‍यांची अजून लखलखीत ओळख महाराष्ट्राला झाली. हे दोन गायक म्हणजे महेश काळे आणि राहुल देशपांडे. आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नवनवीन गोष्टी तो प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात वा भारतातच नव्हे तर विदेशातसुध्दा आपल्या शास्त्रीय कलेचे प्रयोग सादर करून महेश काळे जगभरातील रसिक प्रेक्षकांची माने जिंकत आहेत. या दोघांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर तरुण पिढीला शास्त्रीय संगीताकडे खेचून आणण्याची किमया करून दाखविली आहे.

आता हे दोन दिग्गज प्रथमच सूर नवा, ध्यास नवाच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत. कार्यक्रमात त्यांची जुगलबंदी रंगणार आहे. गप्पा रंगणार आहेत. ते काही अनुभव, अविस्मरणीय आठवणी प्रेक्षकांना सांगणार आहेत.

Intro:सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर प्रेक्षकांना अनेकदा महेश काळे यांनी सादर केलेल्या गाण्याचा नजराणा मिळाला आहे... त्यांच्या गायिकेने आपल्याला अनेकदा सुखद अनुभव दिला आहे.. पण येत्या आठवड्यामध्ये मात्र सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर रंगणार आहे शास्त्रीय सुरांची खास जुगलबंदी...कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर शास्त्रीय संगितातील दोन हीर्‍यांची अजून लखलखीत ओळख महाराष्ट्राला झाली... हे दोन गायक म्हणजे महेश काळे आणि राहुल देशपांडे. आजोबा वसंतराव देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताचा वारसा राहुल देशपांडे गेले अनेक वर्ष समर्थपणे पुढे नेत आहेत. आपल्या गायकीमधील नवनवीन गोष्टी तो प्रेक्षकांसमोर सादर करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात वा भारतातच नव्हे तर विदेशातसुध्दा आपल्या शास्त्रीय कलेचे प्रयोग सादर करून महेश काळे जगभारतील रसिक प्रेक्षकांची माने जिंकत आहेत. या दोघांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर तरुण पिढीला शास्त्रीय संगितकडे खेचून आणण्याची किमया करून दाखविली आहे... आणि आता हे दोन दिग्गज प्रथमच सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत... कार्यक्रमात त्यांची जुगलबंदी रंगणार आहे, गप्पा रंगणार आहेत, ते काही अनुभव, अनेक अविस्मरणीय आठवणी प्रेक्षकांना सांगणार आहेत.
महेश काळे आणि राहुल देशपांडे पहिल्यांदाच मंचावर एकत्र येणार आणि गाणी सादर होणार नाही असे अशक्यच... महेश काळे आणि राहुल यांची जुगलबंदी सुरू होताच सगळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. ‘सुरत पिया की’ यावर त्यांनी जुगलबंदी सादर करून सगळ्यांची मने जिंकली... महेश काळे आणि राहुल देशपांडे यांना एकत्र एकाच मंचावर प्रेक्षकांना ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामध्ये. राहुल देशपांडे यांनी सुर से सजी हे गाणे देखील सादर करून कार्यक्रमात वेगळे रंग भरले...

आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळी शैली निवडून आणि ती तेवढ्याच उत्तम पद्धतीने सादर करून स्पर्धकांनी आपल्या कॅप्टनसना आणि राहुल देशपांडे यांची मनं जिंकले.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.