‘छोटी सरदारनी' मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा, मेहेर आणि सरबजी, ज्या साकारल्या आहेत अनुक्रमे निमरित कौर अहलुवालिया आणि अविनेश रेखी यांनी, आणि त्यांची ड्रा मा, अॅक्शन आणि अविरत मनोरंजनाने परिपूर्ण अश्या प्रेमकथेने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून दूर होण्यापर्यंत आणि शेवटी सर्व विषमतांवर मात करत एकत्र येण्यापर्यंत या जोडीने प्रेमाच्या दृढ शक्तीला दर्शविले आहे. कलर्सवरील लोकप्रिय मालिका 'छोटी सरदारनी' ने ५०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत आणि साहजिकच त्यातील कलाकार व संपूर्ण टीमने हा खास क्षण जल्लोषात साजरा केला.
प्रत्येक टप्प्यावर मेहेर आणि सरबजी यांच्या नात्याची परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि या जोडप्याने प्रत्येक आव्हानावर प्रबळपणे मात केली आहे. या मालिकेने लांबचा पल्ला गाठला आहे आणि ५०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केल्यावर कलाकार व टीमने या खास प्रसंगासाठी तयार केलेले सानु-कूल टी-शर्टस् परिधान करत हा क्षण साजरा केला.
५०० भाग पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना अविनेश म्हणाला, ''मी आमच्यामागे खंबीरपणे उभे राहिलेल्या आणि आमच्या जीवनाचा भाग बनलेल्या मालिकेच्या चाहत्यांचे देखील आभार मानतो. हा प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे आणि मी प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेतला आहे. आम्ही हा नवीन सुवर्ण टप्पा गाठला असताना मी या प्रयत्नामध्ये साह्य केलेल्या सर्वांचे आभार मानतो. मी सर्व चाहत्यांना इतकेच सांगू इच्छितो की, मालिका 'छोटी सरदारनी'मध्ये पुढे बरेच रोमांचक क्षण पाहायला मिळणार आहेत. तर मग मालिका पाहत राहा आणि तुमच्या आशीर्वादांचा वर्षाव करत राहा. आमचा असे अधिक खास सुवर्ण टप्पे संपादित करण्याचा मनसुबा आहे.''
मालिकेच्या यशाबाबत सांगताना निमरित म्हणाली, ''मालिकेचे कलाकार व टीम प्रत्येक चढ-उतारादरम्यान हेल्पफुल राहिली आहे आणि आमच्या अथक मेहनतीमुळे सेलिब्रेशन्स व सुवर्ण टप्पे अधिक आनंददायी बनले आहेत. आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्याचे आणि नवीन सुवर्ण टप्पे संपादित करण्याचे वचन देतो. मेहेरच्या भूमिकेमुळे मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व प्रशंसा मिळाली आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानते. मेहेर व सरबच्या प्रवासाला पुन्हा एकदा रोमांचक वळण मिळणार आहे.''
'छोटी सरदारनी' ही मालिका प्रसारित होते दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता कलर्स वाहिनीवर.
हेही वाचा - मंदिरात चोरी केल्यावर 'त्याने' घेतले देवीचे दर्शन, व्हिडिओ व्हायरल