मुंबई - 'कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे', असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 'होऊ दे व्हायरल' या यशस्वी पर्वानंतर आता वेगळं काय? तर आता 'चला हवा येऊ द्या' चं विशेष 'सेलिब्रिटी पर्व' प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे. या पर्वात झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सिलेब्रिटी सहभागी होणार आहेत.
कोण आहेत हे कलाकार -
अभिज्ञा भावे, गार्गी फुले-थत्ते, राज हंचनाळे, दीप्ती सोनावणे, महेश जाधव, पल्लवी वैद्य, अद्वैत दादरकर, मिहीर राजदा, शर्मिला राजाराम, उमेश जगताप, मिथिला साळगावकर, मोहिनीराज गटणे, आशुतोष गोखले, राहुल मगदूम, या कलाकारांच्या कॉमेडीची झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. मात्र, अजूनही काही कलाकारांची नाव गुलदस्त्यात आहेत, जी लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतील.
