ETV Bharat / sitara

‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग’ मधून दिसले मराठी कलाकारांचे क्रिकेटप्रेम आणि सामाजिक बांधिलकी! - मराठी कलाकारांचे क्रिकेटप्रेम

नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग’ मध्येही (CCDL) नामवंत मराठी कलाकारांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर आपल्या चौकार, षटकारांच्या आतषबाजीने उपस्थित प्रेक्षकांनाही खूष केले.

सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग
सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग
author img

By

Published : Nov 29, 2021, 10:04 PM IST

आपल्या देशांमध्ये मनोरंजनसृष्टीत स्टार्स असतात त्याचप्रमाणे आपल्याकडे क्रिकेट स्टार्स सुद्धा प्रसिद्ध आहेत. किंबहुना कलाकार आणि क्रिकेटर्स सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवितात आणि या दोन्ही क्षेत्रातील स्टार्स असामाजिक बांधिलकीही जपताना दिसतात. त्यामुळेच ‘क्रिकेटपटूंची कलाकारी’ आणि ‘कलाकारांचे क्रिकेटप्रेम’ सर्वश्रुत आहे. त्यामुळे अभिनयातून चर्चेत राहणारी कलाकार मंडळी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रमांत सहभागी झालेले अनेकदा पहायला मिळतात.

सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग
सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग

नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग’ मध्येही (CCDL) नामवंत मराठी कलाकारांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्याचबरोबर आपल्या चौकार, षटकारांच्या आतषबाजीने उपस्थित प्रेक्षकांनाही खूष केले. विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रभाकर मोरे, सुदेश म्हशीलकर, मेघा घाडगे, जयवंत भालेकर, अतुल आगलावे, कैलास वाघमारे, अंकुर वाढवे, प्रणव रावराणे, ओम जंगम, नयन जाधव, कांचन पगारे, संदीप जुवाटकर, महेश कोकाटे, अनिकेत केळकर यांसारखी अनेक कलावंत मंडळी यात सहभागी झाली होती. अभिनेत्री नूतन जयंत ने सर्व ‘कलाकार क्रिकेटर्स’ ना ‘मेंटॉर’ केले. सामने सुरु असताना ती ‘चियर’ करीत खेळाडूंचे मनोधैर्य वाढविताना दिसत होती.

सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग
सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग

‘3 स्टार इंटरटेनमेंट’ आणि ‘राशी स्टुडिओ’ आयोजित तसेच ‘मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड’ आणि दिवंगत ऍड. दयानंद मोहिते फाउंडेशन प्रस्तुत ‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग’ नुकतीच दादरच्या पुरंदरे मैदानात संपन्न झाली. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आठ संघानी यात सहभाग घेतला होता. त्यातील ‘ऑस्ट्रीच’ संघाने विजेतेपद पटकावले तर ‘ईगल’ संघ उपविजेता ठरला. दोन्ही संघांना आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानचिन्हांनी गौरविण्यात आले. या ‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग’ मध्ये अनेक मराठी कलाकार सहभागी झाले होते. एकही रुपये मानधन न घेता या कार्यक्रमातून मिळणारे पैसे मदतनिधी म्हणून बालकाश्रमांना देण्यात आले.

सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग
सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग

‘सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग’ चे (CCDL) आयोजक सचिन मोहिते, संदीप मोहिते, संदेश मोहिते, पूर्णिमा वाव्हळ, संचित यादव, अमर पारखे, राकेश शेळके, शितल माने शेळके यांच्यातर्फे ‘नमस्ते फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेला ही आर्थिक मदत दिली गेली. एका चांगल्या उपक्रमाला हातभार लागल्याबद्दल कलाकारांनीही आनंद व्यक्त केला. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून हे सामने खेळवले गेले. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि केबल चॅनलवर लाईव्ह करण्यात आले होते.

सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग
सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीग

हेही वाचा - End Of Iffi 52 : समारोप सोहळ्याला माधुरी दिक्षीत, रणधीर कपूर यांची उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.