ETV Bharat / sitara

राजकारणात 'या' कलाकारांनी मारली बाजी, 'हे' कलाकार ठरले अपयशी

author img

By

Published : May 24, 2019, 1:40 PM IST

कलाक्षेत्रातीलही बरेच सेलिब्रीटी यावेळी राजकारणात उतरले होते. त्यापैकी काही कलाकारांच्या वाट्याला अपयश आले. तर, काही कलाकारांनी आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला.

राजकारणात 'या' कलाकारांनी मारली बाजी, 'हे' कलाकार ठरले अपयशी

मुंबई - देशभरात मागील काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. अखेर काल (२३ मे) रोजी रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवरांचे भविष्य स्पष्ट झाले. कलाक्षेत्रातीलही बरेच सेलिब्रीटी यावेळी राजकारणात उतरले होते. त्यापैकी काही कलाकारांच्या वाट्याला अपयश आले. तर, काही कलाकारांनी आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला. अशा कलाकारांवर एक नजर...

हेमा मालिनी - 'ड्रिम गर्ल' अशी ओळख असलेल्या बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी या भाजपकडुन मथुरा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवत होत्या. त्यांचा विजय झाला आहे.

hema malini
हेमा मालिनी

नुसरत जहां - अभिनेत्री नुसरत जहां यांनी तृणमुल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. बसिरहाट मतदारसंघात त्यांनी विजय मिळवला.

nusrat jaha
नुसरत जहां

किरण खेर - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनीदेखील भाजपकडुन निवडणूक लढवली. त्या चंदीगढ मतदार संघातून विजयी झाल्या आहेत.

kirron kher
किरण खेर

जयाप्रदा - अभिनेत्री जया प्रदा यादेखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. भाजपकडुन जरी त्यांनी रामपूरमधुन निवडणूक लढवली असली, तरी त्यांना अपयश मिळाले आहे.

jayaprada
जयाप्रदा

रवी किशन - भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी भाजपकडुन निवडणूक लढवली होती. गोरखपूरमधुन त्यांना विजय मिळाला आहे.

ravi kishan
रवी किशन

शत्रुघ्न सिन्हा - बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय असलेले शत्रुघ्न सिन्हा यांना यावेळी पराभव पत्कारावा लागला आहे. काँग्रेस पक्षाकडुन ते पटना साहिब मतदार संघातून निवडणूक लढवली.

shatrughn sinha
शत्रुघ्न सिन्हा

उर्मिला मातोंडकर - काँग्रेस पक्षाकडुनच उभ्या असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनीही यावेळी पहिल्यांदाच राजकारणात एन्ट्री घेतली होती. मात्र, मुंबई मतदार संघात त्यांना गोपाळ शेट्टी यांनी टक्कर दिली. त्यामुळे त्यांनादेखील हार पत्कारावी लागली आहे.

urmila matondkar
उर्मिला मातोंडकर

सनी देओल - भाजपकडुन गुरूदासपूर मतदार संघात सनी देओल यांनीही विजय मिळवला आहे. त्यामुळे आता 'ढाई किलो'चा हात भाजपशी जोडला गेला आहे.

sunny deol
सनी देओल

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.